आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indo Wordnet Come Into 18 Languages, Indian Lanugaes Tool Availabel From August

इंडो-वर्डनेटच्या माध्यमातून इंग्रजीचा 18 भाषांत अनुवाद, ऑगस्टपर्यंत येणार स्वदेशी भाषांतर टूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत - इंग्रजीतून भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी येणा-या अडचणी आता लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. कारण आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी विकसित केलेल्या ‘इंडो वर्डनेट’ हे तंत्रज्ञानाद्वारे आता इंग्रजीतून थेट 18 भारतीय भाषांमध्ये भाषांतर करता येईल. हे तंत्रज्ञान ऑगस्ट महिन्यापर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यासाठी इंग्लिश टू इंडियन लँग्वेज मशीन ट्रान्सलेशन (ईआयएलएमटी)च्या दुस-या टप्प्याच्या प्रकल्पावर सध्या आयआयटी मुंबईचा एक चमू कार्य करत आहे. या प्रकल्पाला ‘इंडो वर्डनेट’ असे नाव देण्यात आले आहे. या टूल आणि सर्च इंजिनच्या माध्यमाद्वारे इंग्रजीतून हिंदी, बंगाली, मराठी, उडुपी, उर्दू, तामिळ, बोडो, गुजराती, आसामी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, नेपाळी, पंजाबी, संस्कृत आणि तेलगू भाषेत अनुवादित करता येईल. या टूलच्या माध्यमातून सर्व भाषांतील माहिती वरील इतर भाषेतही अनुवादित करता येऊ शकते. पर्यटन उद्योग, लेखक तथा अनुवादकांना या टूलचा चांगला उपयोग होऊ शकतो.
या संस्थांमध्ये संशोधन सुरू
सी-डॅक - पुणे (कॉन्सोर्टिया लीडर), सी-डॅक-मुंबई, आयआयटी - मुंबई, आयआयटी -हैदराबाद, आयआयटी - अलाहाबाद, कोलकाता, उत्कल विद्यापीठ -बंगळुरू, अमृता कोईम्बतूर, वनस्थली विद्यापीठ, उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठ-जळगाव, नॉर्थ-ईस्टर्न हिल विद्यापीठ आणि धर्मसिंह देसाई विद्यापीठ - गुजरात या ठिकाणी इंडो वर्डनेट टूलवर संशोधन सुरू आहे.
इंडो वर्डनेटचे काम
भारतातील सुमारे 18 भाषांतील 4 लाख 56 हजार 739 शब्द इंडो वर्डनेट डिक्शनरीत नमूद करण्यात आले आहेत. वापरकर्त्याने भाषांतरासाठी ज्या भाषेची निवड केली असेल त्याच भाषेत की-बोर्ड आपोआप रूपांतरित होईल.
द्रविड वर्डनेट पूर्वीपासूनच कार्यरत
द्रविड वर्डनेट या भाषांतर टूलचा प्रकल्प आयआयटी मुंबईने पूर्वीच पूर्ण केला असून तो कार्यरतही आहे. प्रा. पुष्पक भट्टाचार्य आणि त्यांच्या चमूने हा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर इंडो-वर्डनेटचा प्रकल्प हाती घेतला. द्रविड वर्डनेटमध्ये आधी कन्नड, मल्याळम, तामिळ आणि तेलगू या भाषांचाच समावेश होता, परंतु आता त्यात उर्दू आणि मराठी या भाषांचाही समावेश करण्यात आला आहे.
भाषांतराच्या अनेक समस्या
सध्या इंटरनेटवर इंग्रजीतून भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी हवे त्या प्रमाणात साधने उपलब्ध नाहीत. उपलब्ध काही साधनांमध्ये नमूद शब्द भारतीय भाषेची विविधता आणि व्याकरणाच्या दृष्टीने योग्य नाहीत. भारतातील इतर भाषांत भाषांतर करावयाचे झाल्यास आधी इंग्रजीतून हिंदीत आणि त्यानंतर हिंदीतून इतर भाषांत भाषांतर करावे लागते. अनेकदा संबंधित माहिती चुकीच्या स्वरूपात अनुवादित होते.