आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेस्क्यू ऑपरेशन सुरुच; अजूनही अडकले आहेत लोक, मदत म्हणून जखमींना दिल्या जुन्या नोटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर- इंदूर-पाटणा (राजेंद्रनगर) एक्स्प्रेसला कानपूरपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुखराया स्थानकाजवळ रविवारी पहाटे अपघात झाला. एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरून घसरले. अपघात इतका भीषण आहे की, काही डबे एकमेकांत घुसले आहेत. अपघातानेे 126 प्रवाशांचा बळी घेतला असून 200 लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 76 जणांची प्रकृती गंभीर आहेत. परिणामी मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती देखील वर्तवली जात आहे.
दुर्घटनाग्रस्त इंदूर-पाटणा एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये अजूनही काही लोक फसले आहेत. सोमवारीही NDRF च्या पथकाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. क्रेनने काही डबे रुळावरून बाजूला करण्यात आला आहे. एकमेकांत घुसलेले डबे गॅस कटरने कापून बाजूला केले जात आहेत.

लाइव्ह अपडेट्स... दुसर्‍या दिवशीही रेस्क्यू ऑपरेशन सुरुच...
- झांसीत मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. डबे बााजुला करण्याचे काम सुरु आहे.
- NDRF चे रविंदर सिंह यांनी सांगितले की, रेस्क्यू ऑपरेशन रविवारी सकाळी नऊ वाजेपासून सुरु आहे. काही डब्यांमध्ये लोक अडकल्याची शक्यता आहे. NDRF चे जवान ढिगारे उपसण्याचे काम करत आहेत. रेल्वेचे कर्मचारी देखील या कामात मदत करत आहे.

घातपाताची शंका, चौकशी करा
रूळ बदलले होते का? रेल्वे, केंद्राला बदनाम करण्यासाठी कट केला आहे? रेल्वे मंत्रालयाने चौकशी करा.
- मुरली मनोहर जोशी, भाजप

केंद्र सरकार बुलेट ट्रेन चालवण्याची योजना तयार करत आहे. पण सामान्य गाड्यांचे अपघात रोखू शकत नाही.
- राजीव शुक्ला, काँग्रेस

हा घातपात वाटत आहे. रेल्वे रुळावरून उतरल्यावर एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू होत नाहीत. घटनेच्या मुळाशी जावे.
- राजेन गोहेन, रेल्वे राज्यमंत्री

ड्रायव्हरला जर्क जाणवला. रुळाला तडे हे त्याचे कारण असू शकते. हिवाळ्यात अपघाताचे कारण रूळ फ्रॅक्चर असते.
- मनोज सिन्हा, रेल्वे राज्यमंत्री

पुढील स्लाइडवर वाचा, जखमींना मदत म्हणून दिल्या 500च्या जुन्या नोटा...
बातम्या आणखी आहेत...