आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेठीतील पेपर मिल महाराष्ट्रात स्थापन करण्याची तयारी : गिते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघात जगदीशपूर येथे स्थापन करण्यात येणारा कागद कारखाना महाराष्ट्रात रत्नागिरी येथे हलवला जाऊ शकतो. केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री अनंत गिते यांनी त्याचे संकेत दिले आहेत. यावरून काँग्रेस व सत्ताधारी आघाडीत पुन्हा संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.

गिते यांनी सांगितले की, ३, ६५० कोटी रुपये खर्चून जगदीशपूरमध्ये कागद कारखाना सुरू करण्यात येणार होता. परंतु तेथे त्या कारखान्याला जमीन मिळण्यास अडचणी येत आहेत. जर जमीन मिळाली तर हा कारखाना शिफ्ट केला जाणार नाही. परंतु जर मिळालीच नाही तर तो कारखाना महाराष्ट्रात हलवला जाईल व तो रत्नागिरीत सुरू केला जाऊ शकतो. कारण तेथे बांबूची शेती मोठ्या प्रमाणात असून महामार्ग, रेल्वे तसेच विमान कनेक्टिव्हिटी जास्त प्रमाणात आहे. प्रकल्प बदलाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येईल, असे संकेत गितेंनी दिले.

राहुल गांधींचा इशारा : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हा कारखाना हलवू देणार नाही, असा इशारा दिला. केंद्र सरकार सुडाच्या राजकारणातून जगदीशपूरमधील कारखाना महाराष्ट्रात हलवू पाहत आहे. एनडीए सरकार सुडाचे डावपेच खेळत असून त्याविरोधात आपण संसदेच्या पावसाही अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करू. अमेठीतील लोकांच्या हक्कासाठी तीव्र संघर्ष केला जाईल. हा कारखाना हलवू देणार नाही, असा इशारा राहुल गांधींनी दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...