आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मराठी उद्योजिकेने केली आंतरराष्ट्रीय कमोडिटी ट्रेडिंग; कामात दहापट वृध्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैशाली सरवणकर, उद्योजिका - Divya Marathi
वैशाली सरवणकर, उद्योजिका
वैशाली सरवणकर, उद्योजिका

वय : ४० वर्षे
शिक्षण : नरसी माेंजी इन्स्टिट्यूटमधून एमबीए
चर्चेचे कारण : आंतरराष्ट्रीय कमोडिटीत काम करणारी ही देशाची तिसरी भारतीय महिला आहे.
फायनान्स शाखेतून एमबीए केल्यानंतर वैशाली फक्त पुस्तकांतच रमल्या नाहीत. मार्केटिंगमध्ये त्यांना जास्त रस होता. अशातच त्यांनी बंज नामक एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम सुरू केले. ही कंपनी सोयाबीनचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रेडिंग करायची. वैशाली यांच्या मते, सोयाबीन बाजारात स्टार मानल्या जाणाऱ्या संजय जैन यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. वैशाली त्यांच्या सहायक होत्या.
ट्रेड तिकीट जारी करणे, सिंगापूरचे व्यवहार मंजूर करणे, पार पडलेल्या व्यवहारांवर अंमलबजावणी करून अहवाल बनवण्याची वैशाली यांच्यावर जबाबदारी होती. भारतातून सोयाबीन खरेदी करून त्याची आशिया आणि मध्यपूर्व भागातील बाजारात कशी विक्री करायची, हे त्यांना नीट कळले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील १५ वर्षांच्या ट्रेडिंगच्या अनुभवानंतर त्यांनी स्वत:चे काम सुरू केले. मूळ महाराष्ट्रीय असलेल्या वैशाली यांच्या कुटुंबीयांत फक्त वडिलांनीच नोकरी केली, तर भाऊ आणि अन्य नातेवाईक व्यवसायच करतात. त्यांना दोन बहिणीही असून त्यांचे लग्न झाले आहे. वैशाली यांचे पूर्णपणे आपल्या कामावरच लक्ष केंद्रित असते. त्या मका, साखर, ज्वारी, काजू इत्यादींची ट्रेडिंग करतात. या व्यवसायात उतरल्यानंतर सुरुवातीला तर काम करूच शकणार नाही, अशी त्यांना जाणीव झाली. धंदा कसा सुरू आहे, माल उचलला की नाही, लोड झाला की नाही, अशी व्यापाऱ्यांची भाषा असते. हे ऐकून वैशाली यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्यांची भाषा इतकी घाण कधीच नव्हती. त्या काळी या व्यवसायात त्या एकमेव महिला होत्या. तरीसुद्धा त्यांनी शुद्ध भाषेचा आग्रह कायम ठेवला आणि अन्य व्यापाऱ्यांत आपला ठसा उमटवला. मागच्या ५ वर्षांत त्यांनी व्यवसाय १० लाख डॉलरवरून १०० लाख डॉलरवर नेऊन ठेवला. त्यांनी त्यांच्या मूळ गावातील ४० मुली दत्तक घेतल्या आहेत. त्यांच्या शिक्षणाचा खर्च वैशालीच करतात.
पुढील स्लाइडमध्ये, पहिला घोडा ५० वर्षांपूर्वी १५ हजारांत भागीदारीत घेतला