आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Infighting In Uttarakhand Congress Vijay Bahuguna Threatens To Rally

काँग्रेसमध्ये बंडाळी : जयंती नटराजन यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणांची धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेत्या जयंती नटराजन यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर या धक्क्यातून बाहेर येत नाही तोच उत्तराखंडमधून काँग्रेससाठी चिंता वाढवणारी बातमी आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसी नेता विजय बहुगुणा यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत राज्यात आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात यात्रा करण्याची धमकी दिली आहे.
सीएम हरीश रावत यांना पाठवले पत्र-
माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी सीएम हरीश रावत एक पत्र लिहून उत्तराखंडमध्ये जनतेतील वाढता असंतोष पाहता जनआक्रोश यात्रा काढण्याची धमकी दिली आहे. बहुगुणाचे म्हणणे आहे की, राज्यातील जनहिताच्या योजना व विकासकामे ठप्प झाली आहेत. सरकार अशा मुद्यांवर लक्ष देत नाही जे थेट जनतेशी संबंधित आहेत. जर सीएम हरीश रावत यांच्या सरकारने लोकांसाठी घर आणि कंत्राटी कर्मचा-यांना कायमस्वरूपी नोक-या दिल्या नाहीत तर मी जनआक्रोश यात्रा काढणार आहे.
विजय बहुगुणा यांना हटवून हरीश रावत यांना केले होते मुख्यमंत्री
उत्तराखंडमध्ये दीड वर्षापूर्वी उत्तराखंडमध्ये झालेल्या जबरदस्त पावसामुळे हाहाकार माजला होता. त्यावेळी बहुगुणा यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही म्हणून काँग्रेस हायकमांडने बहुगुणा यांच्याऐवजी हरीश रावत यांना मुख्यमंत्री बनविले होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांत संघर्ष सुरु असल्याचे सांगितले जात आहे. उत्तराखंड काँग्रेसमध्ये बंडाळीच्या भाषा बोलली जाऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी सतपाल महाराज यांनी काँग्रेस सोडून थेट भाजपमध्ये जाणे पसंत केले होते. अशावेळी जर विजय बहुगुणा यांनी आपल्याच सरकारविरोधात जनआक्रोश यात्रा काढली तर काँग्रेससाठी ते अडचणीचे ठरू शकते. दरम्यान, बहुगुणा यांनी स्पष्ट केले आहे की, हरीश रावत यांच्याशी त्यांचा व्यक्तिगत कोणताही संघर्ष नाही.