आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inflation Is The Biggest Chaalenge For Centre Goverment

एनडीए महागाईचे खापर यूपीएच्या डोक्यावर फोडणार ? खासदार जाणार जनतेपर्यंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएच्या सरकारवर पहिल्या महिन्यातच महागाईवरून टीका होत आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आणि काही उपाययोजना करण्याची भाजप आखणी करीत आहे. पक्षाने त्यांचे खासदार आणि भाजपशासित राज्यांच्या माध्यमातून महागाई संदर्भात पक्षाचे धोरण जनतेपर्यंत पोहोचवण्याची तयारी चालवली आहे. त्याशिवाय वाढत्या महागाईला यूपीए सरकारचेच धोरण कारणीभूत असल्याचा प्रचार करण्याची त्यांची योजना आहे. त्याही पेक्षा मोठे आव्हान रेल्वे भाडेवाढ, पेट्रोल, डिझेल यांच्या किंमतीत कोणत्या कारणांमुळे वाढ झाली, हे जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर महागाईवर नियंत्रण मिळविणे आपले प्रथम कर्तव्य असेल, असे म्हटले होते. मात्र, त्यांच्या सरकारच्या हनिमुन काळातच महागाईने उच्चांक गाठला. अन्नधान्यासह पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्यात आल्या. त्यामुळे विरोधकांना भाजप प्रणित सरकरारवर टीका करण्याची ऐतीच संधी चालून आली.
महागाई रोखण्यासाठी सरकार सज्ज
7 जुलैपासून केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. त्यासाठी मोदींनी सर्व राज्यांतील अन्नधान्य पुरवठा मंत्र्यांची 4 जुलै रोजी दिल्लीत बैठक बोलावली आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने उचललेले एक पाऊल म्हणून त्यांच्या या बैठकीकडे पाहिले जात आहे. राज्यांना साठेबाजी रोखण्याच्या सुचना बैठकीच्या मा्ध्यमातून केल्या जाणार आहेत. अन्नधान्या आणि इतरही गरजेच्या वस्तूंच्या वितरणात कोणतेही अडथळे येऊ देऊ नका, साठेबाजांवर कारवाई करा, अशा सुचना केंद्रीय पुरवठा सचिवांनी राज्यांना केल्या आहेत.