आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inflation News In Marathi, Sunday Surprise, Divya Marathi, Lok Sabha Election

संडे सरप्राइज: निवडणुकीनंतर वाढणा-या महागाईसाठी तयार राहा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निवडणुकीनंतर सत्तारूढ होणारे सरकार महागाईवर लगाम लावेल अशी आशा बाळगून असाल तर थोडे सावध राहा. निवडणुकांचा पूर्वेतिहास पाहिल्यास निवडणुकीनंतर महागाई वाढत असते. निवडणुकीनंतर ग्राहक दर निर्देशांक उसळी घेतो. याचा थेट परिणाम महागाई वाढण्यावर होतो. म्हणजे राजकीय पक्ष कितीही मोठे आश्वासन देत असले तरी निवडणुकीनंतर सर्वसामान्यांना महागाईशी तोंड द्यावे लागेल. एप्रिल-मे 2009 मध्ये निवडणुकीवेळी ग्राहक दर निर्देशांक (सीपीआय) 160 च्या जवळपास होता. निवडणूक संपताच जूनमध्ये हा निर्देशांक 161 झाला आणि डिसेंबरपर्यंत 181 पर्यंत पोहोचला होता. निवडणूक संपल्यानंतर महागाईच्या झळा आणखी वाढतात हे सन 1996 ते आतापर्यंतच्या आकड्यांतून संकेत मिळतात. तज्ज्ञांच्या मते निवडणुकीत सरकार आणि राजकीय पक्षांचा खर्च वाढतो. त्याचा परिणाम बाजारावर होतो.

निवडणुकीनंतर अशी वाढली महागाई
निवडणूक महागाई निर्देशांक
वर्ष एप्रिल डिसेंबर
०1996 324 350
०1998 382 429
०2004 508 521
‘निवडणुकीच्या एक महिना आधीपासून चार-पाच महिन्यांपर्यंत महागाई वाढते. बहुतांश खर्च मजूर, कामगारांशी संबंधित असतो. राजकीय पक्षांकडून पैसा ओतला जातो. यामुळे काम करणा-यांचा भाव वाढतो व महागाई वाढते.’ - प्रणव सेन, सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष व आर्थिक प्रकरणांचे तज्ज्ञ
पुढे वाचा मिनी संसदेविषयी.....