आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Inflitrated China Stopped Indian Soliders Security Watch

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घुसखोर चीनने रोखली भारतीय जवानांची गस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - चीनचे सैनिक भारतीय हद्दीत केवळ घुसखोरीच करत आहेत असे नव्हे, तर ते भारतीय जवानांना त्या भागात गस्त घालण्यापासूनही रोखत आहेत. लडाख भागात गेल्या आठवड्यात दोन वेळा असा प्रकार घडला आहे.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, उत्तर ट्रेड जंक्शन भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत असलेल्या दोन चौक्यांवर भारतीय सैनिकांनी ‘तिरंगा पेट्रोलिंग अभियान’ सुरू केले आहे. याअंतर्गत गस्त घालत जवान चौकीकडे जात होते त्या वेळी सीमेपलीकडे चीनचे सैनिक अवजड व लष्करी वाहनांमधून दाखल झाले. त्यांच्या हातात बॅनर्स होते. हा भाग चीनचा आहे. तुम्ही या चौक्यांकडून जाऊ नाही शकणार.


सूत्रांनी सांगितले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) या दोन्ही चौक्या भारतीय सीमेच्या आतच आहेत. परंतु चीनच्या सैनिकांनी आक्रमकपणे त्यावर दावा सांगितला. या वर्षी एप्रिलपासून या चौक्यांसाठी 21 वेळा अभियान चालवण्यात आले. परंतु फक्त दोन वेळाच त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यात यश आले.


यावर्षी 15 एप्रिल रोजी दौलतबेग ओल्डी भागात चीन सैन्याने घुसखोरी केली होती. 21 दिवस चीनचे सैनिक या भागात तंबू ठोकून होते. या काळात चीनची लष्करी वाहनेही फिरताना दिसली होती. सीमेवरील बांधकाम पाडण्याची अट मान्य केल्यानंतर चीनने माघार घेतली होती.