आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या भावात वर्षात एका दिवसातील सर्वाधिक वाढ; 990 रुपयांनी वधारून 31,350 रु प्रतितोळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/जयपूर- दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोने ९९० रुपये प्रति १० ग्रॅमने महागले. या वर्षी जानेवारीपासून एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात सोने महागले नव्हते. या वाढीसह सोने ३१,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले, जे १० महिन्यांतील म्हणजेच नोव्हेंबर २०१६ नंतर सर्वाधिक आहे. या आधी दोन दिवसांत भाव २४० रुपये/१० ग्रॅमने घसरले होते. या वर्षी दोन जानेवारी रोजी दिल्लीमध्ये सोने २८,३०० रुपये/१० ग्रॅम होते. म्हणजेच आठ महिन्यांत यात ३,०५० रुपये किंवा १०.७ टक्क्यांची वाढ  झाली आहे.  अमेरिका आणि उत्तर कोरियादरम्यान वाढत असलेल्या तणावामुळेच सोन्याच्या भावात अचानक वाढ नोंदवण्यात आली आहे. या तणावामुळे जागतिक बाजारातील डॉलर निर्देशांक अडीच वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. सलगच्या वादामुळे अमेरिकेची आर्थिक आकडेवारी घसरली आहे. यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. 

 शुक्रवारी सिंगापूर बाजारातही सोने ०.३ टक्क्यांनी वाढून १,३५३ डॉलर प्रति औंसवर पोहोचले. सप्टेंबर २०१६ नंतरचा हा सर्वाधिक भाव आहे. मात्र, रात्री उशिरा भावात घसरण होऊन भाव १,३४५ डॉलर प्रति औंसवर आले होते. चांदीदेखील ०.१९ टक्क्यांनी महाग होऊन १८.१३ डॉलर प्रति औंसवर पोहोचली. देशांतर्गत बाजारात चांदी ४२,००० रुपये प्रति किलोवर विक्री झाली. यात केवळ १०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.  केवळ जागतिक बाजारामुळेच भारतीय बाजारात सोने महाग झाले असल्याचे जयपूरच्या सराफा ट्रेडर्स कमिटीचे उपाध्यक्ष मनीष खुटेटा यांनी सांगितले. 
 
दर वाढण्याची चार कारणे  
- उत्तर कोरिया-अमेरिका दरम्यान तणावामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी वाढली.  
- अमेरिकेमध्ये अॉगस्टमध्ये बेरोजगारी दर ४.३% ने वाढून ४.४% टक्के झाला.  
- इतर चलनाच्या तुलनेत डॉलर निर्देशांक अडीच वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे.  
- फेडरल रिझर्व्हच्या वतीने व्याजदरात वाढ होण्याची शक्यता कमी झाली.  

भारतीय बाजारात मागणीत घट  
नोटाबंदी व जीएसटीमुळे भारतीय बाजारात दागिन्यांची मागणी कमी झाली असल्याचे जयपूर येथील सराफा ट्रेडर्स कमिटीचे अध्यक्ष कैलाश मित्तल यांनी सांगितले. पक्ष पंधरवडा सुरू झाल्यानंतर मागणीत आणखी कमी आली आहे.  
 
सण-उत्सवाच्या काळापर्यंत दरवाढ 
- आगामी काळात सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम किमतीवर होऊ शकतो. 
- या क्षेत्रातील तज्ज्ञ अजय केडिया यांच्या म्हणण्यानुसार, सणांच्या काळात मागणी वाढल्याने दर प्रति 10 ग्रॅम 32500 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 
बातम्या आणखी आहेत...