आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xpose: गुन्हे लपवण्याचा मार्ग झाले हरियाणातील कालवे, 3 वर्षात सापडले 1770 मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कालव्यातून मृतदेह बाहेर काढताना आशू मलिक. - Divya Marathi
कालव्यातून मृतदेह बाहेर काढताना आशू मलिक.
पानिपत- पतियाळाच्या 70 वर्षीय सुखपाल. 3 महिन्यांपूर्वी त्यांचा मोठा मुलगा हरवला. त्याला कोणीतरी मारून कालव्यात टाकले असावे, असा संशय आहे. सुखपाल तेव्हापासून काठीच्या साह्याने  कालव्याचा तळ शोधत असतात.  न जाणो कदाचित त्याचा मृतदेह सापडेल किंवा काहीतरी  ओळखीची खूण तरी दिसून येईल.

जिंदच्या नरवानाच्या सिरसा येथील भाक्राच्या कालव्यात सापडलेल्या मृतदेहात ते आपल्या मुलांचा मृतदेह शोधत होते. परंतु अजूनही त्यांचा शोध थांबलेला नाही. कारण मृतदेह इतके कुजलेल्या अवस्थेत असतात की ओळख पटणेही कठीण जात आहे. तरीही ते छातीवर दगड ठेवून थरथरत्या हाताने मृतदेह चाचपडत असतात.
 
ही कथा एकट्या सुखपाल यांचीच नाही. तर असे अनेक माता-पिता आपला मुलगा किंवा मुले आपल्या पित्याचा शोध घेत आहेत. कारण एप्रिल - मे महिन्यात भाक्राच्या धरणातून पाणी कमी सोडले जाते. त्यामुळे मृतदेह तरंगताना दिसतात. दोन तृतीयांश मृतदेह हत्या करून फेकलेले असतात. याला 3 वर्षांत सापडलेल्या मृतदेहामुळे पुष्टी मिळते. तीन वर्षांपूर्वी येथे 1770 मृतदेह सापडले. तीन वर्षापूर्वी येथील कालव्यात 150 ते 200 मृतदेह सापडले. 

एप्रिल-मेमध्ये मृतदेह सापडतात
उत्तराखंड, हिमाचल, पंजाब, राजस्थान व  हरियाणातील लोक दरवर्षी हरवतात, मृतदेह वाहत दिल्लीपर्यंत जातात...

7 दिवसांनंतर ओळख पटणे अशक्य
आठवड्यानंतर कुजतो : एक आठवड्यानंतर मृतदेह कुजण्यास सुरूवात होते. जिंदमध्ये 16 पैकी दोन मृतदेहांची ओळख पटली

मृतदेह वाहून जातो: राज्यात 14 हजार किमी लांबीच्या कालव्याचे जाळे पसरलेले. 70 टक्के मृतदेह कोणीतरी मारुन फेकलेले असतात. 

असा फायदा घेतात गुन्हेगार
मृतदेह टाकले जातात: पोलिसांच्या संगनमताने कालव्यावरील कर्मचारी मृतदेह फेकतात. ते मृतदेह 300 किमी दूर वाहात जातात. 
न्यायवैद्यक तपासणी अवघड: मृतदेह इतका कुजलेल्या अवस्थेत असतो की, न्यायवैद्यक तपासणी करणे ही अवघड जाते. 

कालव्यात सापडलेल्या मृतदेहाचे आकडे   
2014: 520 मृतदेह
2015: 520 मृतदेह
2016: 670 मृतदेह
 
... सरकार आणि समाजालाही धडा
या मुद्द्यावर सरकारने अद्यापपर्यंत काही ठाेस उपाययोजना शोधून काढलेली नाही. दर 3 ते 4 महिन्यांत शेजारील राज्यांसोबत महासंचालक स्तरावर बैठक होते. परंतु त्यात औपचारिकता असते. समाजालाही जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. आपल्या दुर्लक्षामुळेच गुन्हे वाढत आहेत. 
 
पुढील स्लाइडवर वाचा तीन दु:खद घटना आणि पाहा संबंधित घटनेचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...