आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचीन भारतातील प्रणय शिक्षणाचे केंद्र, काळाबरोबर विस्मृतीत गेली होती ही माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लैंगिक शिक्षण आणि त्यावरून होणारे वाद नवीन नाहीत. याबाबत पाश्चिमात्य देशांत भारताच्या तुलनेत जास्त जागरूकता असल्याचे दाखले दिले जातात. परंतु प्राचीन भारत देशात अनेक शतकांपूर्वी लैंगिक शिक्षणाबाबत मोठा प्रयोग करण्यात आला होता. मंदिरांवरच कामशिल्पांची निर्मिती करण्यात आली होती. एवढेच नाही, तर स्त्री आणि पुरुषाच्या मिलन आणि संबंधांवर कामशास्त्राची रचनाही झालेली आहे.
 
प्राचीन स्थळ
- त्या काळात याचे शिक्षण आणि प्रसाराचे मोठे केंद्र म्हणून या प्राचीन इमारतींचा आधार घेण्यात आला होता. आजही ही स्थळे याच प्रणय कलेच्या कलाकृतींसाठी केवळ भारतच नाही, तर विश्वाचे आकर्षण ठरली आहेत. 
- मध्य प्रदेशचे खजुराहो कधीकाळी खजुराच्या जंगलांसाठी ओळखले जात होते. परंतु आज हे जंगल कामसंबंधी अनुपम कलाकृतींसाठी जगभराच्या पर्यटक, अभ्यासकांसाठी मोठे केंद्र बनले आहे.
- कामुक मूर्तींनी सजलेल्या या मंदिरांमुळे खजुराहो जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशा चार पुरुषार्थांचे वर्णन आढळते. तत्कालीन भारतात काम हा विषय एक क्रीडा आणि कलेच्या रूपात पाहिला जायचा. 
- तथापि, काळाबरोबर हा विचार लुप्त होत गेला आणि केवळ बीभत्सपणाच लक्षात घेतला जाऊ लागला. तेव्हा अध्यात्मातही काम  म्हणजे प्रकृतीच्या जवळ जाण्याचा एक पर्याय असल्याचे मानले जायचे. भारतात अशीच आणखी काही मंदिरे आहेत ज्यांच्या भिंतींवर स्त्री-पुरुषांच्या संबंधांना योगरूपात शिल्पांमधून दाखवण्यात आले आहे. जी देशी-विदेशी नागरिकांसाठी कुतूहल आणि अभ्यासाचा विषय ठरली आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या मंदिराशी निगडित रोचक कथा....
बातम्या आणखी आहेत...