आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीयूषना रेल्वे तर निर्मलांना डिफेन्स मंत्रालय : दोघांसमोर असणार ही मोठी आव्हाने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयाचे काय होणार, या प्रश्नाचे उत्तर सर्वांना मिळाले आहे. सुरेश प्रभुंनी सलग झालेल्या अपघातांनंतर रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी सोडल्यानंतर, मोदींनी पीयूष गोयल यांना ही जबाबदारी दिली. तर दुसरीकडे सीमेवरचा धोका वाढत असताना देशाला स्वतंत्र संरक्षण मंत्री नसल्याची टीका होत होती. त्यासंदर्भात सर्वांना धक्का देत, मोदींनी निर्मला सीतारमण यांची निवड केली. इंदिरा गांधींनंतर त्या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री असतील. आता आगामी काळातही या दोन मंत्र्यांच्या कामावरच सगळ्यांच्या नजरा असतील. कारण रेल्वेत अपघातांची संख्या कमी करून त्याचे मॉडर्नायझेशन करायचे आहे. तर सीमेवर वाढणाऱ्या आव्हानांमुळे सीतारमण यांच्या कामावर स्वतः मोदी नजर ठेवून असतील. 

पीयूष गोयल यांच्यासमोरची 3 आव्हाने 
1) प्रवाशांची सुरक्षा 

- डिरेलमेंट : नुकतेच दोन मोठे रेल्वे अपघात झाले आहेत. 19 आणि 23 ऑगस्टच्या या अपघातांत 23 जणांनी प्राण गमावले. कारण जुनेच होते, ते म्हणजे डिरेलमेंट. निती आयोगानेही डिरेलमेंट हेच अपघाताचे सर्वात मोठे कारण असल्याचे म्हटले होते. 2012-13 पासून 2016-17 दरम्यान झालेल्या 586 रेल्वे अपघातांपैकी  53% हे डिरेलमेंटमुले झाले होते. 
- नव्या कोचेसची कमतरता : डिरेलमेंटमध्ये कोच पलटी होतात किंवा एकमेकांवर चढतात, हाय लेव्हल सेक्युरिटी रिव्ह्यूसाठी तयार करम्यात आलेली केंद्राची काकोदर कमिटीनेही जुन्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) कोचेस ना लिंक हॉफमॅन बुश (LHB) कोचेसने रिप्लेस करण्याची शिफारस दिली आहे. हे कोच आधुनिक आहेत. त्याच डिरेलमेंटमध्ये धोका कमी होतो. 

2) नव्या कोचेसची व्यवस्था  
- काकोदकर कमिटीने केलेली एक महत्त्वाची शिफारस म्हणजे रेल्वेचे ICH डिझाइन असलेल्या कोचऐवजी सुरक्षित असे LHB कोच वापरणे. त्यासाठी 2012 ते 2017 दरम्यान 10 हजार कोटी खर्च करण्यात येणार असे म्हटले होते. 
- ICF कोचेसमध्ये वापरले जाणारे स्विस तंत्रज्ञान 1950 च्या दरम्यानचे आहे. आधी या तंत्रामुळे अपघातांत अनेक प्राण वाचवण्यास मदत झालेली आहे. पण आता स्पीड आणि ट्रॅकशी संबंधित काही अडचणी समोर येत आहेत. काकोदकर कमिटीच्या मते, ICF कोचेस रेल्वेची सध्याची गती 100-120Kmph सुरक्षित नाही. 
3) LBH चा किती वापर ?
- जर्मन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या लिंक हॉफमॅन बुश कोचेसची ट्रायल भारतात झाली आहे. कपूरतळामधील रेल्वे कोच फॅक्टरीला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अॅग्रिमेंटही भेटले आहे. सध्या 8 हजार LBH कोचेस ऑपरेशनल आहेत तेही बहुतांश राजधानी आणि शताब्दी रेल्वेंमध्ये आहेत. 
- LBH कोचेस 160Kmph च्या वेगानेही धावू शकतात. हे हल्के आणि कमी आवाज करणारे आहेत. एअरकंडिशनिंग चांगले आहे. लांब आणि रुंदही आहेत. त्यात प्रवाशांची संख्या 10% वाढते आणि ते सुरक्षितही आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, निर्मला यांच्या समोरची आव्हाने कोणती...
बातम्या आणखी आहेत...