आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने डोकलाममध्ये केल्या 7 चुका, चिनी न्यूज चॅनलवर उडवली खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनी मीडियामध्ये डोकलाम वादावरुन भारताची खिल्ली उडवण्यात आली. - Divya Marathi
चीनी मीडियामध्ये डोकलाम वादावरुन भारताची खिल्ली उडवण्यात आली.
नवी दिल्ली/बीजिंग - डोकलाम वादावरुन चिनी माध्यमांनी भारताची खिल्ली उडवली आहे. चीनचे सरकारी न्यूज चॅनल शिन्हुआवरील स्पार्क या शोमध्ये भारताने डोकलाममध्ये 2 महिन्यात 7 चुका केल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच झोपलेल्यांना उठवता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही, असा उपरोधिक टोलाही लगावला आहे. 
स्पार्क शोची अँकर म्हणते, 'संपूर्ण जग भारताला जागे करण्याचा प्रयत्न करत आहे. आता चीनला जाणिव झाली आहे, की अशा व्यक्तीला उठवता येत नाही ज्याने झोपेचे सोंग घेतले आहे.' 
या व्हिडिओमध्ये भारतीय पोशाखात एक व्यक्ती दाखवण्यात आली आहे. ती म्हणते, माझ्यावर कोणीही आरोप करत नाही, कारण मी निद्राधीन आहे. 
 
काय आहे भारत-चीन वाद 
- सिक्कीम सेक्टरमध्ये भूतान ट्रायजंक्शन जवळ चीनला एक रस्ता तयार करायचा आहे. या मार्गाला भारत आणि भूतान दोन्ही देशांनी विरोध केला आहे. 
- जवळपास दोन महिन्यांपासून सिक्कीममधील डोकलाम येथे भारत आणि चीन सैन्य आमने-सामने आहे. या दरम्यानच्या काळात त्यांच्यात अनेकदा मारहाण आणि दगडफेकही झाली आहे. 

ट्विटरवर पोस्ट केला व्हिडिओ 
- शिन्हुआच्या इंग्लिश ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ही मायक्रो ब्लॉगिंग साइट भारतात ब्लॉक आहे. 
- स्पार्क शोची अँकर डाएर वेंग डोकलाम प्रकरणात भारताने 7 चुका केल्याचे सांगते. 
 
व्हिडिओत सांगितल्या या 7 चुका 
1- घुसखोरी 
2 - द्विपक्षीय कराराचे उल्लंघन 
3 - आंतरराष्ट्रीय कायद्याकडे दुर्लक्ष
4 - खरे काय आणि खोटे काय याबद्दल संभ्रम निर्माण करणे 
5 - पीडितवरच आरोप करणे 
6 - छोट्या शेजाऱ्याचे अपहरण करणे 
7 - चुकीला जाणीवपूर्वक कवटाळून ठेवणे 
बातम्या आणखी आहेत...