आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार लिंकची मुदत 31 मार्चपर्यंत हाेणार! केंद्राची आधारबाबत सुप्रीम कोर्टात माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधारला सरकारी सेवांशी लिंक करण्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर पुढील आठवड्यात सुनावणी होईल. - Divya Marathi
आधारला सरकारी सेवांशी लिंक करण्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर पुढील आठवड्यात सुनावणी होईल.

नवी दिल्ली- विविध योजनांना आधार जोडण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यास केंद्र सरकार तयार आहे. गुरुवारी सरकारने सर्वाेच्च न्यायालयात याबाबत माहिती दिली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या न्यायपीठासमोर आधार खटल्याचा उल्लेख करून वेगवान सुनावणीची मागणी करण्यात आली हाेती. वरिष्ठ वकील श्याम दिवाण यांनी सांगितले की, विविध योजना आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे. ती लवकरच संपणार आहे. यामुळे अंतरिम दिलाशाशी निगडित याचिकांवर त्वरित सुनावणी केली पाहिजे. दुसरीकडे, केंद्राकडून अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले की, सरकार आधार लिंक करण्याची वेळमर्यादा ३१ मार्चपर्यंत वाढवण्यास तयार आहे.  


- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील बेंचसमोर सरकारच्या वतीने अटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल उपस्थित झाले. 
- ते म्हणाले, आधारला सर्व सेवांशी जोडण्याची तारीख वाढवण्याची सरकारची तयारी आहे. 
- या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे वकील, श्याम दिवाण यांनी कोर्टात म्हटले होते की, आधार लिंक करण्याची डेडलाईन संपत आहे, त्यामुळे याचिकाकर्त्यांना दिलासा मिळण्यासाठी त्यांचे म्हणणे ऐकायला हवे. 


5 न्यायाधीशांचे पीठ पुढील आठवड्यात करणार सुनावणी 
- आधारला सरकारी सेवांशी लिंक करण्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. 
- या याचिकांमध्ये सरकारच्या निर्णयास अंतरिम स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. 
- सुप्रीम कोर्ट यासाठी 5 न्यायाधीशांचे पीठ तयार करणार आहे. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, सुप्रीम कोर्टाने केव्हा काय म्हटले.. 

बातम्या आणखी आहेत...