आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉस्पिटलने जुळ्या मुलांना मृत घोषित केले, अंत्यसंस्काराआधी एकाचा श्वास सुरू झाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीतील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची बेपर्वा वृती दिसून आली. रुग्णालयात जन्मलेल्या जुळ्यांना मृत सांगून त्यांचे मृतदेह पॉलिथिन बॅगेत गंुडाळून पालकांकडे दिले.  नंतर एक बाळ जिवंत झाल्याचे आढळले. यानंतर संतप्त पालकांनी रुग्णालयात गांेधळ घातला. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी याचा अहवाल मागवला आहे.  आता पोलिस या घटनेची चौकशी करत आहेत.

 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष यांची पत्नी वर्षा हिने गुरुवारी मॅक्स हॉस्पिटलमध्ये जुळ्यांना जन्म दिला. यामध्ये एक मुलगा व एक मुलगी होती. मुलगी जन्मत:च मृत होती तर मुलावर उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी एक तासाने दुसऱ्या बाळाचाही मृत्यू झाल्याचे सांगितले. पालक त्यांचे मृतदेह घेऊन काही अंतरावर असतानाच एका बाळात हालचाल सुरू झाली. पालकांनी जवळच्या दवाखान्यात त्यास भरती केले. मॅक्स व्यवस्थापनाने संबंधित डॉक्टरास सुटीवर पाठवून त्याची चौकशी सुरू केली आहे.

 

जन्मानंतर लगेच एका बाळाचा मृत्यू झाला...
- मीडिया रिपोर्टसनुसार, दिल्लीचे प्रवीण कुमार यांनी गुरुवारी प्रसूतीसाठी पत्नीला मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. येथे महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. सूत्रांनुसार, एका बाळाचा जन्मानंतर लगेच मृत्यू झाला.
- दुसरे नवजात जिवंत होते. डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक सांगून देखरेखीत ठेवण्याविषयी सांगितले. काही तासांनी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दोघांना एका पॅकेटमध्ये ठेवून कुटुंबाला सोपवण्यात आले.
- गुरुवारी जेव्हा कुटुंब अंत्यसंस्कारासाठी त्यांना घेऊन स्मशानात गेले तेव्हा एका नवजाताचे श्वास सुरू होते. हे पाहून तेथे उपस्थित सर्वजण चकित झाले. लगेच त्याला जवळच्या एका रुग्णालयात नेण्यात आले. आणि उपचार सुरू झाले.

 

काय म्हणणे आहे हॉस्पिटलचे?
- घटनेबद्दल मॅक्स हॉस्पिटलने स्पष्टीकरण देताना म्हटले की, कुटुंबाला प्री-मॅच्योर बाळ सोपवले होते. त्याच्या जिवंतपणाचे कोणतेही लक्षण नव्हते.
- मॅक्स हेल्थकेअरच्या जबाबानुसार, आम्ही या विचित्र घटनेमुळे चकित झालो आहोत. यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. केस पाहणाऱ्या डॉक्टरांना तत्काळ प्रभावाने सुटीवर पाठवण्यात आले आहे. कुटुंबाशी सातत्याने संपर्कात आहोत, त्यांची पूर्ण मदत करू."

 

काय म्हणाले पोलिस?
- दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते दीपेंद्र पाठक म्हणाले की, ही घटना चकित करणारी आहे. घोर लापरवाहीचे प्रकरण आहे. आम्ही याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. यासाठी विधिज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. दिल्ली मेडिकल कौन्सिलशी बोलून पूर्ण घटनाक्रमाची माहिती घेत आहोत. यानंतर जबाबदारांविरुद्ध आवश्यक कारवाई केली जाईल.

 

आरोग्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
- मॅक्स हॉस्पिटलमध्ये झालेल्या घटनेनंतर आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी मंत्रालयाच्या सचिवांशी चर्चा केली. त्यांनी चौकशी आणि आवश्यक कारवाईचे आदेश जारी केले आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचा घटनाक्रम...

बातम्या आणखी आहेत...