आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी Special: जगातील 11% सोने भारतीय महिलांकडे, 5% भारतीय अब्जाधीश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिवाळी धन आणि ऐश्वर्याचा सण म्हणून ओळखला जातो. लक्ष्मीपूजन करून लोक सुखसमृद्धीची कामना करतात. या वेळी देशाच्या समृद्धीबाबत बोलायचे झाल्यास जगभरातील सोन्याच्या एकूण साठ्यापैकी 11% सोने तर भारतीय महिलांकडेच आहे. हे प्रमाण ब्रिटन आणि सौदी अरबहून जास्त आहे. 1991 मध्ये मंदीमुळे रिझर्व्ह बँकेला 47 टन सोने परदेशात गहाण ठेवावे लागले होते, परंतु एका अंदाजानुसार देशातील मंदिरांत आणि घरांत तब्बल 22 हजार टन सोने सध्या आहे. देशात हाय नेटवर्थ इंडिविज्युअल्स (HNWI)ची संख्या अडीच लाखांच्या वर पोहोचली आहे. एवढेच नाही, जगभरातील 5% अब्जाधीश भारतातच आहेत. 
 
DivyaMarathi.com तुम्हाला सांगत आहे समृद्धीशी निगडित 4 बाबी...
 
1) जगातील गोल्ड स्टॉकच्या 11% भारतीय महिलांजवळ
- भारतीयांना सोन्याची प्रचंड आवड आहे. कारण सोने शुभ मानले जाते. यामुळे भारतीय घरांमध्ये 18 हजार टन सोने जमा आहे. हे जगातील सोन्याच्या एकूण साठ्याच्या 11% आहे. याची किंमत 950 बिलियन डॉलर (61लाख 80 हजार कोटी रुपये) आहे.
- वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनुसार, भारतात घरांमध्ये आणि मंदिरांत असलेले सोने 22 हजार टन आहे.
 
2) जगातील 5% बिलियनेयर्स भारतात, जगातील आठवे मोठे वेल्थ मार्केटबाहेर
- "The India 2017 Wealth Report - Wealth Trends and Insights" च्या नुसार, भारत जगातील आठवे सर्वात मोठे वेल्थ मार्केट आहे.
- 2016च्या शेवटपर्यंत हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स (HNWIs)ची संख्या 2 लाख 64 हजार होती, यांची वेल्थ होल्डिंग 30 मिलियन डॉलर (195 कोटी रुपये) असल्याचे अनुमान आहे.
- मागच्या 10 वर्षांत हाय नेटवर्थ इंडिविज्युअल्समध्ये 290% वाढ झाली, तर 2015 पासून 2016 दरम्यान यात 12% वाढ झाली. सध्या जगातील 2 टक्के कोट्यधीश आणि 5% अब्जाधीश भारतात आहेत.
- तथापि, HNWI अशा लोकांना म्हटले जाते, ज्यांची वैयक्तिक संपत्ती 1 लाख डॉलर (तब्बल 65 लाख रुपये) हून जास्त असते.
 
3) 460 लाख टन धान्यसाठा
- फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानुसार, सध्या देशात 460 लाख टन धान्य (गहू आणि तांदूळ) राखीव आहे. मागच्या वर्षी याच वेळी हा साठा 407 लाख टन होता. म्हणजेच वर्षभरात देशात धान्य साठा 53 लाख टनांनी वाढला.
- 1972 मध्ये भारतात मोठा दुष्काळ आला होता. तेव्हा सरकारला 20 लाख टन (2 कोटी क्विंटल) धान्य परदेशातून मागवावे लागले होते.
 
4) 393 बिलियन डॉलरचे फॉरेन एक्स्चेंज रिझर्व्ह
- आरबीआयच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2017 मध्ये देशात फॉरेन एक्स्चेंज रिझर्व्ह (विदेशी मुद्रा भंडार) 393 बिलियन डॉलर (तब्बल 25 लाख 57 हजार कोटी रुपये) या नव्या उंचीवर पोहोचले होते.
- आरबीआयच्या मते, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)मध्ये भारताची रिझर्व्ह पोझिशनही 2.27 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचली. ही फ्रान्स, स्वीडन, जर्मनी, डेन्मार्क अशा देशांपेक्षा 10 पट जास्त आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिक माहिती...
बातम्या आणखी आहेत...