आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचकुला जमीन वाटपप्रकरणी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांची चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय अन्वेषण विभागाने सोमवारी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांची जमीन वाटपप्रकरणी चौकशी केली. हे प्रकरण हरियाणा विकास प्राधिकरणाद्वारे १४ औद्योगिक कारखान्यांना देण्यात आलेल्या जमिनीशी संबंधित आहे.

बाजारभावापेक्षा कमी किमतीत जमीन देण्यात आली होती. यात राजकीय नेते, नोकरशहांसह अनेक दिग्गजांचे निकटवर्तीय होते. हुड्डा या प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. यात २ आयएएस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. सीबीआयने काही दिवसांपूर्वीच यूपीएससीचे सदस्य,मुख्यमंत्री छत्तर सिंह यांच्या प्रमुख सचिवांचीही चौकशी केली होती. जमिनीच्या वाटपाचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातून जारी करण्यात आले होते, असा आरोप आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी २०१५ मध्ये राज्य दक्षता आयोगाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
बातम्या आणखी आहेत...