आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#NoFakeNews: 1 Oct.पासून बँकेतून कापले जाणार दर महिन्याला 20 रुपये, आदेश जारी?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आधार संबंधी इंटरनेट आणि सोशल मीडियावर रोज काही ना काही मेसेज व्हायरल होत असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या मॅसेजमध्ये बँकेत आधार लिंक न करणाऱ्या ग्राहकांच्या खात्यातून दर महिना 20 हजार रुपये दंड वसूल करणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. यासंबंधीचा अध्यादेशही सरकारने जारी केला असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. खात्यातून 20 हजार रुपये कपात होणार म्हटल्याने सर्वसमान्यांचा ठोका चुकला नाही तर नवल. त्यामुळे DivyaMarathi.com या व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 
 
काय आहे व्हायरल मेसेज?
- व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, आधार संबंधी मोठा निर्णय झाला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत बँक खात्याला आधार लिंक केले नाही तर खात्यातून दर महिना 20 हजार रुपये दंड वसूल केला जाईल. 
- या संबंधीच्याच दुसऱ्या मेसेजमध्ये म्हटले आहे, की आधारच्या सर्व डेडलाइन संपल्या आहेत. आधार तयार करणारी संस्था UIDAI नेही सरकारला नोटिफिकेशन पाठवले आहे..... आता 20 रुपये भरण्यासाठी तयार राहा. 
 
आमच्या पडताळणीत काय आढळले 
- व्हायरल मेसेजमध्ये आधार तयार करणारी संस्था UIDAI चा उल्लेख असल्याने आम्ही सत्य जाणून घेण्यासाठी या संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर यासंबंधी काही सापडते का याची पडताळणी केली. 
- त्यामध्ये आम्हाला एक लिंक सापडली. ज्यामध्ये 20 हजार रुपये दंड वसूल करण्याचा उल्लेख होता. 
- या लिंक नुसार, ज्या बँकांमध्ये आधार एनरोलमेंट सेंटर नाही त्या बँकेच्या शाखेकडून 1 ऑक्टोबरपासून UIDAI दरमाह 20 हजार रुपये दंड वसूल करणार आहे. 
- बँकाना आपल्या दर 10 शाखांपैकी एका शाखेत 30 सप्टेंबरपर्यंत आधार एनरोलमेंट सेंटर सुरु करण्याचे आदेश आहे. ज्या बँका आधार एनरोलमेंट सेंटर सुरु करणार नाही त्यांना 1 ऑक्टोबरपासून दर महिना 20 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
- UIDAI चे सीईओ अजय भूषण यांनी सांगितले, की यासंबंधी सर्व बँकांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यांना 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. यामध्ये आधारकार्ड धारकांचा कुठेही उल्लेख नाही. त्यांच्याकडून कोणताच दंड वसूल केला जाणार नाही. 
 
सत्य काय आहे?
- व्हायरल मेसेजचे सत्य हे आहे की 20 हजार रुपये दंड बँकांकडून वसूल केला जाणार आहे. खातेधारकांना याची झळ बसणार नाही.
 
बातम्या आणखी आहेत...