आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रद्युम्न हत्याकांड : आरोपी विद्यार्थ्याने सुधारगृहात रात्री 1 वाजेपर्यंत पाहिले तारक मेहता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव - प्रद्युम्न ठाकूर हत्याकांड प्रकरणात सीबीआयने हरियाणा पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सीबीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हरियाणा पोलिसांनी पुराव्यांकडे दुर्लक्ष करत ते नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर काहीही ठोस पुरावा नसताना कंडक्टर अशोक कुमारला अटक करण्यात आली. या  संशयामुळे पोलिसांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी केली जाणार आहे. त्यांच्या विरोधात डिपार्टमेंटल अॅक्शन घेतली जाऊ शकते. रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये 8 सप्टेंबरला  प्रद्युम्न (7 वर्षे) याची हत्या झाली होती. 

रात्री उशीरापर्यंत पाहिले.. तारक मेहता 
- रिमांड संपल्यानंतर आरोपी विद्यार्थ्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. याठिकाणी त्याने शनिवारी पहिला रात्र अगदी बिनधास्तपणे घालवली.
- टिव्हीवर मालिका पाहिल्या पण त्याला न्यूज चॅनल पाहायची इच्छा नव्हती. 
- बालसुधारगृहात तो पियानो वाजवणार असल्याचीही शक्यता आहे. 
 
कोणाला झाली होती अटक?
- या खटल्यात शाळेच्या बसचा कंडक्टर अशोक कुमार याच्याशिवाय रेयान ग्रुपचे दोन अधिकारी नॉर्थ झोन हेड फ्रांसिस थॉमस आणि भोंडसी येथील शाळेचे कोऑर्डिनेटर यांना अटक झाली होती. या अधिकाऱ्यांना जामीन मिळाला होता. पण अशोक अजूनही न्यायालयीन कोठडीत आहे. सोहना रोड येथील सदर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यालाही निलंबित करण्यात आले होते. 
- दुसरीकडे रेयान ग्रुपचे सीईओ रेयान पिंटो, त्यांचे वडिल ऑगस्टीन पिंटो आणि आई ग्रेस पिंटो यांनी मुंबई हायकोर्टा आणि नंतर पंजाब-हरियाणा हायकोर्टात याचिका दाखल करत अटकपूर्वी जामीनाची मागणी केली होती. नंतर त्यांना पंजाब-हरियाणा हायकोर्टाने जामीन दिला. 

काय आहे प्रकरण... 
- गुरुग्राम (गुडगाव) रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये 8 सप्टेंबरला 7 वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. टॉयलेटमध्ये त्याचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारला अटक केली होती. आरोपी अशोकने 8 महिन्यांपूर्वीच शाळेत कंडक्टरची नोकरी सुरू केली होती. 
- अशोकने मीडियाला सांगितले की, माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी मुलांच्या टॉयलेटमध्ये होतो आणि त्याठिकाणी वाईट कृत्य करत होता. त्याचवेळी त्याठिकाणी तो मुलगा आला. त्याने मला पाहिले. मी आधी त्याला धक्का दिला नंतर त्याल ओढले. तो ओरडायला लागला तेव्हा मी घाबरलो. त्यानंतर त्याला दोनवेळा चाकू मारला आणि त्याचा गळा कापला. 
 
पुढे वाचा, आरोपीचा बालसुधारगृहातील पहिला दिवस कसा होता...
बातम्या आणखी आहेत...