आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीचे घर सोडून BF सोबत लिव-इनमध्ये राहात होती, मृत्यू देणारी बाइकवरुन आली घरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोएडा - कांचन पतीचे घरसोडून बॉयफ्रेंडसोबत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. नोएडामधील सेक्टर 39 मध्ये बुधवारी एका अज्ञात महिलेने तिची गोळ्या झाडून हत्या केली. त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड कुणाल जॉबवर गेलेला होता. सध्या तो फरार आहे. 

बाइकवर आली होती मृत्यू देणारी 
- शहर पोलिस आयुक्त अरुण कुमार सिंह यांनी सांगितल्यानुसार, कांचनचे कुणाल नावाच्या तरुणावर प्रेम होते. विवाहित असलेली कांचन पतीचे घरसोडून त्याच्यासोबत लिव-इनमध्ये राहात होती. 
- बुधवारी कांचन घरी एकटीच होती. तेव्हा घरासमोर एक बाइक येऊन थांबली. बाइक स्वाराने ब्ल्यू शर्ट घातलेला होते. 
- बाइकस्वारासोबत एक मुलगी होती. तिने तोंडाला स्कार्फ बांधलेला होता.  
- ती एकटीच बाइकवरुन उतरली आणि फ्लॅटमध्ये गेली. 
- कांचनने दार उघडताच स्कार्फ बांधलेल्या मुलीने तिच्या गळ्यावर गोळ्या झाडल्या आणि आपल्या साथीदारासोबत पसार झाली. 
 
पोलिस काय म्हणाले 
- शहर पोलिस आयुक्त म्हणाले, कांचनचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून गुरुवारी पोस्टमॉर्टम करण्यात आले. 
- आरोपी महिला आणि तिच्या साथीदाराला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिस आयुक्तांनी व्यक्त केला आहे. 
- पोलिस कांचन, तिचा पती आणि बॉयफ्रेंड यांचे बॅकग्राऊंड धुंडाळत आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समध्ये जाणून घ्या कांचनचे लिव-इन रिलेशनशिप 
बातम्या आणखी आहेत...