आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रद्युम्न हत्याकांड : आरोपी विद्यार्थी बालसुधारगृहात मुलांना विचारतोय, 'किती शिक्षा होऊ शकते?'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरीदाबाद - प्रद्युम्न हत्याकांडातील अटक करण्यात आलेल्या आरोपीबाबत एक नवी माहिती हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, बालसुधारगृहात आरोपी त्याच्याबरोबर असलेल्या विद्यार्थ्यांना विचारतोय की, जर कोर्टाने एखाद्याला दोषी ठरवले तर त्याला किती वर्षांची शिक्षा मिळते. या बालसुधारगृहातून सुनावणीसाठी बाहेर आलेल्या एका मुलाकडून ही माहिती मिळाली आहे. 

मंगळवारीही घेतली आई वडिलांनी भेट...
- मंगळवारीही आरोपी विद्यार्थ्याच्या आई वडील आणि लहान भावाने त्याची भेट घेतली. त्याचबरोबर आरोपीचे इतर नातेवाईकही त्यांच्याबरोबर होते. त्याशिवाय फरीदाबादच्या बालसुरक्षा आणि संरक्षण कार्यालयातील तीन समुपदेशकांनीही त्याच्याशी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये चर्चा केली. 
- आरोपीच्या वडिलांनी म्हटले आहे की, कंडक्टर अशोकच्या विरोधात 9 मिनिटांचा व्हिडिओ आहे तर त्यांच्या मुलाचा मात्र केवळ 1 मिनिट,17 सेकंदांचा व्हिडिओ आहे. मुलाच्या विरोधात सीबीआयकडे काहीही ठोस पुरावा नाही, केवळ दबावाच्या बळावर सीबीआय त्याला फसवत आहे. 
- हरियाणाचे मंत्री राव नरबीर सिंह यांनीही सीबीआय चौकशी नको असे म्हटले होते, असे आरोपीचे वडील म्हणाले. सीबीआयकडे दिल्यास तपास लांबू शकतो असे ते म्हणाल्याचे आरोपीचे वडील म्हणाले. 

कोणाला झाली होती अटक?
- या खटल्यात शाळेच्या बसचा कंडक्टर अशोक कुमार याच्याशिवाय रेयान ग्रुपचे दोन अधिकारी नॉर्थ झोन हेड फ्रांसिस थॉमस आणि भोंडसी येथील शाळेचे कोऑर्डिनेटर यांना अटक झाली होती. या अधिकाऱ्यांना जामीन मिळाला होता. पण अशोक अजूनही न्यायालयीन कोठडीत आहे. सोहना रोड येथील सदर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यालाही निलंबित करण्यात आले होते. 
- दुसरीकडे रेयान ग्रुपचे सीईओ रेयान पिंटो, त्यांचे वडिल ऑगस्टीन पिंटो आणि आई ग्रेस पिंटो यांनी मुंबई हायकोर्टा आणि नंतर पंजाब-हरियाणा हायकोर्टात याचिका दाखल करत अटकपूर्वी जामीनाची मागणी केली होती. नंतर त्यांना पंजाब-हरियाणा हायकोर्टाने जामीन दिला. 

काय आहे प्रकरण... 
- गुरुग्राम (गुडगाव) रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये 8 सप्टेंबरला 7 वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. टॉयलेटमध्ये त्याचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारला अटक केली होती. आरोपी अशोकने 8 महिन्यांपूर्वीच शाळेत कंडक्टरची नोकरी सुरू केली होती. 
- अशोकने मीडियाला सांगितले की, माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी मुलांच्या टॉयलेटमध्ये होतो आणि त्याठिकाणी वाईट कृत्य करत होता. त्याचवेळी त्याठिकाणी तो मुलगा आला. त्याने मला पाहिले. मी आधी त्याला धक्का दिला नंतर त्याल ओढले. तो ओरडायला लागला तेव्हा मी घाबरलो. त्यानंतर त्याला दोनवेळा चाकू मारला आणि त्याचा गळा कापला. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, प्रद्युम्न हत्याकांडाबाबत काही महत्त्वाचे..
बातम्या आणखी आहेत...