आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 राज्यांत केवळ रुपयाने वाढली मनरेगाची मजुरी, फॉर्म्युला बदलण्यासाठी सरकारने बनवली समिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- या वर्षी मनरेगामध्ये सर्वात कमी मजुरी वाढली आहे. आसाम, बिहार, झारखंड, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये दररोजच्या मजुरीत केवळ एक रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ ओडिशामध्ये दाेन रुपये आणि पश्चिम बंगालमध्ये चार रुपये आहे. त्यामुळे सरकार आता मजुरी वाढवण्यासंबंधित फॉर्म्युला बदलण्याचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी सरकारने ग्रामीण विकास अतिरिक्त सचिव नागेश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवली आहे. गेल्या वर्षीच्या ५.७ टक्क्यांच्या तुलनेत या वर्षी यातील सरासरी वाढ २.७ टक्के राहिली. या वाढीसह मजुरी एक एप्रिलपासून लागू झाली आहे. काही राज्यांनी किमान वेतनाची मर्यादा निश्चित केलेली आहे. मनरेगामध्ये दरमहा ग्रामीण कुटुंबीयांना वर्षात कमीत कमी १०० दिवस रोजगार देण्याची हमी देण्यात येते. 

बिहार-झारखंडमध्ये १ रु., एमपीमध्ये ५ रु. वाढ
सध्या कृषी मजुरांच्या ग्राहकी मूल्य निर्देशांकांच्या आधारावर मनरेगातील मजुरी निश्चित केली जाते. हा आकडा कृषी कामगारांच्या आधारावर निश्चित होतो. यामुळे कमी कृषी उत्पन्न असणाऱ्या राज्यांत निर्देशांक कमी असतो. यामुळे या राज्यांमध्ये कमी वेतन वाढ होते.  

राज्यांच्या कृषी मजुरांच्या निर्देशांकावर ठरते मजुरी
गेल्या वर्षी बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड चार राज्यांमध्ये मजुरी १६७ रुपये होती. या वर्षी बिहार-झारखंडमध्ये एक रुपयांनी मजुरी वाढली असून एमपी व  छत्तीसगडमध्ये ५ रुपयांनी वाढली आहे. गेल्या वर्षी बिहार झारखंडमध्ये ५ रुपयांनी तर एमपी-छत्तीसगडमध्ये ८ रु. वाढली.

३ वर्षे जुन्या अहवालावर अद्याप अमल नाही 
मनरेगामध्ये आधीचे दोन वर्षे मजुरी राज्यांच्या किमान वेतनाच्या बरोबरीत होती. मात्र, २००८ मध्ये केंद्र सरकारने याला कृषी कामगारांच्या निर्देशांकाशी जोडले. या निर्णयाच्या समीक्षेसाठी २०१३ मध्ये यूपीए सरकारने अर्थतज्ज्ञ  महेंद्र देव यांच्या अध्यक्षतेखाली समिती बनवली होती. समितीने २०१४ च्या अहवालात आधार वर्ष बदलण्याची शिफारस केली होती. मात्र, या अहवालाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
 
सर्वाधिक मजुरी हरियाणात, सर्वात कमी बिहारमध्ये
सरासरी वाढ केवळ २.७%
बिहार    १६८
झारखंड    १६८
मध्य प्रदेश    १७२
छत्तीसगड    १७२
उत्तर प्रदेश    १७५
उत्तराखंड    १७५
गुजरात    १९२
राजस्थान    १९२
महाराष्ट्र     २०१
पंजाब     २३३
चंदिगड     २६५
हरियाणा    २७७
(दैनंदिन मजुरी रुपयात)

सर्वाधिक मजुरी 
हरियाणा    २७७ (२५९)
चंदिगड     २६५ (२४८)
केरळ     २५८ (२४०)
(मजुरी रुपयात)

सर्वात कमी मजुरी
बिहार    १६८  (१६७)
झारखंड    १६८  (१६७)
एमपी, छत्तीसगड १७२  (१६७)
(मजुरी रुपयात, कंसातील आकडे गेल्या वर्षीचे)
बातम्या आणखी आहेत...