आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत मोदीच्या नव्या कॅबिनेटमधील 9 चेहरे, 4 मंत्री आहेत माजी IAS, IPS, IFS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी मंत्रिमंडळामध्ये निवड झालेले 9 नवे मंत्री वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे आहेत. या मंत्र्यांची निवड करतांना त्यांचा अनुभवही लक्षात घेण्यात आल्याचे आवर्जून लक्षात येते. नऊपैकी चारजण IAS, IPS आणि IFS राहिलेले आहेत. उर्वरीत तीन चेहरे मध्यप्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानातून आहेत. या राज्यांत येत्या वर्षभरात निवडणूका होणार आहेत. या सर्व चेहऱ्यांची निवड करतांना त्यांना असलेला अनुभव, कार्यक्षमता आणि झपाटून काम करण्याची क्षमताही ध्यानात घेतलेली दिसते. या नव्या मंत्र्यांसह विद्यमान मंत्र्यांचे प्रमोशन करून न्यू इंडिया व्हिजनला प्रोत्साहन देऊ इच्छित आहेत. 
 
पुढे वाचा - मोदी कॅबिनेटमधील नऊ चेहरे 

1) सत्यपाल सिंह (62)  
कोण आहेत : सत्यपाल सिंह जाट समूहातून येतात. संजीव बालियान यांच्यानंतर पश्चिम यूपीतील प्रमुख चेहरा आहे. महाराष्ट्र केडरमध्ये 1980 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी राहिलेले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबईचे पोलिस आयुक्त होते. यादरम्यान 1990 च्या दशकात मुंबई अंडरवर्ल्डचा नायनाट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. त्यावेळी छोटा राजन, छोटा शकील आणि अरुण गवळीच्या गँगचा दबदबा होता. 2014 च्या लोकसभा निवडणूकांपूर्वी भाजपात प्रवेश करून बागपत येथून खासदार म्हणून निवडून आले. 
मंत्रिपदासाठी निवड होण्याचे कारण : प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव. मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाच्या अनुभवासह पारदर्शक चेहरा. पश्चिम यूपीमध्ये जाट समूहाचे प्रतिनिधीत्व. 
कोणाचे निकटवर्तीय : राजनाथ सिंह आणि अमित शाह
 
2) अल्फोन्स कन्ननथानम (64)
कोण आहेत : अल्फोन्स कन्ननथानम केरळमधील भाजपाचा चेहरा आहेत. 27 वर्षे आयएएस म्हणून काम करण्याचा अनुभव पाठिशी आहे. केरळमधील कोट्टायम मध्ये 1989 साली जिल्हाधिकारी असतांना साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठे योगदान त्यांनी दिले. दिल्लीमध्ये DDA  आयुक्तपदी असतांना अनधिकृत बांधकाम हटविले. त्यामुळे त्यांची ओळख डिमोलिश मॅन म्हणून झाली होती. 2006 मध्ये ते कोट्टायम विधानसभा मतदार संघातून  LDFच्या तिकीटावर निवडून आले. मात्र, 2011च्या निवडणूकीत त्यांनी भाजपात प्रवेश करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. नितीन गडकरींनी त्यांना भाजपाचे प्राबल्य वाढविण्यासाठी पक्षात आणले होते. गडकरींच्या शिफारशीवरच त्यांना मंत्रीपद बहाल करण्यात आल्याचे मानले जात आहे. 
मंत्रिपदासाठी निवड होण्याचे कारण : 27 वर्षे आयएस पदाचा अनुभव. केरळमध्ये साक्षरता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान. 
कोणाचे निकटवर्तीय : नितीन गडकरी 
 
3) अश्विनी कुमार चौबे (64)
कोण आहेत : बिहारच्या बक्सर मतदारसंघातून भाजपाचे खासदार आहेत. बिहारच्या राजकारणात प्रभावशाली चेहरा. भाजपाचे वरिष्ठ लीडर असून गव्हर्नन्सचा अनुभव आहे. माजी आरोग्य मंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. विद्यार्थी दशेत असल्यापासून राजकारणाचा अनुभव, यादरम्यान तुरुंगातही जावे लागले. 
मंत्रिपदासाठी निवड होण्याचे कारण : फायरब्रँड आणि लोकांशी थेट जनसंपर्क असलेला नेता.
कोणाचे निकटवर्तीय : आरएसएस प्रमुख मोहन भागवत

4) डॉ. वीरेंद्र कुमार (63)
कोण आहेत : डॉ. विरेंद्र कुमार मध्यप्रदेशच्या टीकमगढ मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. लोकसभेवर पाचव्यांदा खासदार म्हणून निवड झाली आहे. 1996 मध्ये पहिल्यांदा खासदार पदाची धुरा सांभाळली. 1975 मध्ये झज्ञलेल्या जेपी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. बंदीदरम्यान त्यांना 16 महिने तुरुंगाची हवा खावी लागली. 1977 मध्ये विद्यार्थी दशेत असतांना राजकारणाला सुरवात.
मंत्रिपदासाठी निवड होण्याचे कारण : कास्ट फॅक्टर, दलित चेहरा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पकड.
कोणाचे निकटवर्तीय : कोणाशीही नाही 
 
5) शिव प्रताप शुक्ल (65)
कोण आहेत : यूपीचे वरिष्ठ भाजपा नेता. अनुभवी नेता मानले जातात. यूपी मध्ये कॅबीनेट मंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. शिक्षण, ग्रामीण विकास आणि तुरुंगाची स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या कामांसाठी ओळखले जातात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि बीजेवपायएमचेही सदस्य होते. याव्यतरिक्त भाजपाशी दीर्घ काळापासून जोडलेले आहेत. 
मंत्रिपदासाठी निवड होण्याचे कारण : यूपी मध्ये राजनाथ-कल्याण सरकारमध्ये मंत्रीपदाचा अनुभव, शिक्षण आणि ग्रामीण विकासावर मजबूत पकड.
कोणाचे निकटवर्तीय : राजनाथ सिंह 
 
6) आरके सिंह (64)
कोण आहेत : माजी आयएएस आएएस अधिकारी. 1990 मध्ये लालू प्रसाद यादव यांच्या आदेशावरून लालकृष्ण अडवाणी यांना अटक करण्यात आली होती. अडवाणी त्यावेळी राम रथ यात्रेसह अयोध्येला जात होते. 1999 ते 2004 दरम्यान गृहमंत्री राहिलेले अडवाणी यांनी आरके सिंह यांना जॉईंट सेक्रेटरी केले होते. डिसेंबर 2013 मध्ये भाजपा प्रवेश केल्यानंतर 2014 मध्ये आरा येथून भाजपाच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले. 
मंत्रिपदासाठी निवड होण्याचे कारण : प्रशासकीय स्किल, 38 वर्षे आयएएस असतांना देशाचे गृहसचिव म्हणून कामाचा अनुभव.
कोणाचे निकटवर्तीय : अमित शाह, नीतीश कुमार. 
 
7) अनंत कुमार हेगड़े (49)
कोण आहेत : कर्नाटकच्या उत्तर कन्नड मधून पाचवेळा खासदार म्हणून निवडून आले. इस्लाम आणि दहशतवादासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत. मुस्लिम संघटनांच्या विरोधाचा सामना.
मंत्रिपदासाठी निवड होण्याचे कारण : कर्नाटकमध्ये लवकरच निवडणूका आहेत. अयोध्या आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका, तसेच संघाचे स्वयंसेवक. 
कोणाचे निकटवर्तीय : भाजपाच्या जुन्या नेत्यांशी जवळचे संबंध
 
8) गजेंद्र सिंह शेखावत (49)
कोण आहेत : राजस्थान भाजपाचा मोठा चेहरा. राष्ट्रीय पातळीवर भाजपाचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम पाहिलेले आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी साठी ओळखले जातात. Quora वर सर्वाधिक फॉलो होणारे भारतीय राजकारणी. त्यांचे 50 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. विद्यार्थी दशेत असतांना राजकारणाला सुरवात. एबीव्हीपी आणि संघाशी जोडलेले आहेत. जोधपूर मतदारसंघातून खासदार आहेत. 
मंत्रिपदासाठी निवड होण्याचे कारण : राजस्थानच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन. स्वदेशी जागरण मंचचे सदस्य. शेतकरी आणि आर्थिक प्रकरणांवर पकड. 
कोणाचे निकटवर्तीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएस
 
9) हरदीप सिंह पुरी (65)
कोण आहेत : माजी आयएफएस अधिकारी. यूनायटेड नेशन्स सेक्युरिटी काऊंसिल टेररिज्म कमिटीचे चेअरमन राहिलेले आहेत. 2009 ते 2013 दरम्यान यूएनमध्ये प्रतिनिधीत्व केले. 
मंत्रिपदासाठी निवड होण्याचे कारण : परराष्ट्र प्रकरणांचे माहितीगार, 39 वर्षे आयएफएस पदाचा अनुभव. 2009 ते 2013 यूएनमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. 
कोणाचे निकटवर्तीय : राजनाथ सिंह 
 
या चार मंत्रालयांना प्रतिक्षा फुलटाईम मंत्र्यांची 
- संरक्षण : मनोहर पर्रिकर गोव्यात मुख्यमंत्री म्हणून परतले. त्यानंतर अरुण जेटलींकडे संरक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी आहे. 
- पर्यावरण : राज्यसभा सदस्य अनिल माधव दवे यांचे निधन झाल्यानंतर पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार डॉ. हर्षवर्धन यांच्यावर सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारी आहे. 
- शहरी विकास : एम वैंकेय्या नायडू उपराष्ट्रपती झाल्यानंतर शहरी विकास मंत्रालयाची जबाबदारी नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे देण्यात आली. त्यांच्याकडे ग्रामीण विकास मंत्रालय आहे. 
- माहिती प्रसारण : नायडू यांच्याकडे असलेल्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी स्मृती इराणी यांच्याकडे सोपिवण्यात आली आहे. स्मृती इराणी यांच्याकडे पूर्णवेळ वस्त्रोद्योग मंत्रालय आहे. 
 
आणखी किती मंत्री होऊ शकतात?
- सध्या केंद्र सरकारमध्ये पंतप्रधानांसह 73 मंत्री आहेत. मंत्र्यांची संख्या 81 पेक्षा अधिक अशक्य आहे. त्यामुळे मोदी आणखी 8 मंत्र्यांना कॅबीनेटमध्ये संधी देऊ शकतात. 
- 73 मंत्र्यांपैकी 24 कॅबीनेट, तर 12 राज्यमंत्री आहेत. 36 मंत्र्यांकडे स्वतंत्र मंत्रालयाचा कारभार आहे. 
बातम्या आणखी आहेत...