आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईपीएफओ घरांची निर्मिती नव्हे, तर घर खरेदीत मदत करेल : दत्तात्रेय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) घरांची निर्मिती करणार नसून केवळ घर खरेदी करण्यासाठी आपल्या खातेदारांची मदत करणार असल्याचे कामगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी स्पष्ट केले. खातेधारक पीएफ जमा रकमेतील ९० टक्के रक्कम घर खरेदी करण्यासाठी काढू शकतील. पीएफ खातेधारक जमा रकमेतून गृहकर्जाचा ईएमआयदेखील भरू शकतील.  

काही दिवसांपूर्वीच ईपीएफओ शहरी विकास मंत्रालयासोबत मिळून दोन वर्षांत १० लाख घरे बांधणार असल्याचे वृत्त आले होते. मात्र, ईपीएफओचा घरे बांधकामाशी काहीही संबंध नसल्याचे दत्तात्रेय यांनी स्पष्ट केले आहे. ईपीएफओ संघटनेच्या ४.३१ कोटी सदस्यांसाठी सामूहिक गृह योजनेच्या नव्या नियमांचीही आखणी करण्यात येत असल्याचे 
त्यांनी सांगितले.  

ज्या कामगारांना १५,००० रुपयांपेक्षा कमी पगार आहेत त्या कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचेही दत्तात्रेय यांनी स्पष्ट केले. या योजनेत शहरी विकास मंत्रालय आणि इतर विभागांचाही समावेश करण्यात येणार आहे. सध्या सरकार कमजोर वर्गातील लोकांना घर खरेदी करण्यासाठी १.५ लाख रुपयांची सबसिडी देत आहे. इतर वर्गातील लोकांसाठीदेखील सबसिडी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व योजना एकत्र करता येऊ शकतात. ईपीएफओसाठी किमान पगाराची (बेसिक) मर्यादा १५ हजारांवरून वाढवून २५ हजार रुपये करण्याचाही प्रस्ताव पुढील बैठकीत चर्चेत ठेवण्यात आला असल्याचे दत्तात्रेय यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...