आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीव्हीपॅट खरेदीसाठी केंद्राकडून किती रक्कम घेतली? निवडणूक आयोगास सुप्रिम कोर्टाची विचारणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- व्हीव्हीपॅट खरेदीसाठी  केंद्राकडून किती रक्कम घेतली? यावर शपथपत्र दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगास दिले आहे. न्यायालयात आणखी दोन याचिकांची सुनावणी सुरू आहे. यातील एक याचिका  बसपाच्या प्रमुख मायावती यांनी दाखल केली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत ईव्हीएमद्वारे मतदानात छेडछाड केल्याची त्यांची तक्रार आहे.
 
बसपाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ पी. चिदंबरम न्यायालयात हजर झाले. व्हीव्हीपॅटचा वापर कधीपासून करण्यात येईल हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे, असे त्यांनी म्हटले. माध्यमात एक अहवाल आला असून केंद्र सरकार व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट)साठी केंद्राने निधी दिल्याचे म्हटले हाेते. केंद्र सरकारने गेल्या महिन्यात निवडणूक आयोगास ३१७४ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. हा प्रस्ताव आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट खरेदी करण्यासंदर्भात होता.
 
निवडणूक आयोगाने यावर शपथपत्र दाखल करावे, अशी मागणी चिदंबरम यांनी केली. व्हीव्हीपॅटमुळे मतदारास चिठ्ठी मिळेल. त्यामुळे कोणास मतदान केले याची माहिती त्यास होईल. ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा िवरोधकांचा आरोप असून देशभरात ३ लाख व्हीव्हीपॅट ईव्हीएमला जोडण्याची गरज असेल. याचा खर्च ३ हजार कोटी रुपये इतका अाहे.
बातम्या आणखी आहेत...