आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांत 2.37 कोटी खपासह मुद्रित माध्यम क्षेत्राची वाढ; दैनिक भास्करच्या खपात 150% वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गेल्या १० वर्षांत देशातील मुद्रित माध्यम क्षेत्राने ४.८७% दराने वार्षिक (सीएजीआर) वाढ नाेंदवली आहे. २००६ मध्ये प्रकाशनांचा खप ३.९१ कोटी अंक होता. ताे वाढून २०१६ पर्यंत ६.२८ कोटींवर गेला आहे. या दरम्यान विक्रीत २.३७ कोटी अंकांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, या १० वर्षांत दैनिक भास्करच्या अंकांचा खप १५० टक्क्यांनी वाढला आहे. २००६ मध्ये तो १५ लाख २७,५५१ होता. २०१६ मध्ये ताे ३८ लाख १३,२७१ वर गेला. ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन्स (एबीसी) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. देशातील प्रिंट मीडियाला इतर माध्यमांकडून कडवे आव्हान मिळत असताना हे तथ्य समोर आले आहे. एबीसी ही स्वतंत्र संस्था आहे, जी दर सहा महिन्यांत मुद्रित प्रकाशनांच्या अंक विक्रीचे ऑडिट करून त्यांना प्रमाणित करते.

अहवालानुसार, अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स व ऑस्ट्रेलिया या विकसित देशांत वृत्तपत्रांचा खप २ ते १२ टक्क्यांनी घसरत आहे. भारतात वृत्तपत्रांचा आकडा १२% वेगाने वाढतो आहे. जपान, फ्रान्स व ऑस्ट्रेलियात तीन वर्षांपासून पेड न्यूजपेपर्सचा आकडा जैसे थे आहे. भारतात मात्र तो दुहेरी अंकांनी वाढत आहे. २०१३ मध्ये तो ५,७६७ होता. २०१४ मध्ये तो १६.७०% वाढून ६,७३० वर गेला. २०१५ मध्ये हा आकडा १६.९५% वाढून ७,८७१ वर गेला.  

अहवालानुसार, वार्षिक अंक विक्रीत उत्तर विभागात सर्वाधिक ७.८४%, तर दक्षिण विभागात ४.९५% वाढ झाली. पश्चिम व पूर्व क्षेत्रात अनुक्रमे २.८७% व २.६३% वाढ झाली. देशात सध्या प्रकाशनांचा आकडा ९६७ असून ९१० वृत्तपत्रे व ५७ नियतकालिके आहेत. २००६ मध्ये देशात ६५९ प्रकाशन केंद्रे होती. ती १० वर्षांत २५१ ने वाढून ९१० झाली. हिंदी भाषेत सर्वाधिक ८.७६% दराने प्रकाशने वाढली. इंग्रजी २.८७% वृद्धिदरासह सहाव्या स्थानी आहे.

खप वाढण्याची मुख्य कारणे
१.साक्षरतेचे प्रमाण वाढल्यामुळे.
२.आर्थिक व्यवहारांतील तेजी.
३.दररोज वृत्तपत्र वाचण्याची वाचकांची सवय.
४.घरी सहजतेने उपलब्ध होणे.
५.स्पर्धेमुळे किमतीत घट.
६.केंद्रस्थानी वाचकाला मानणे.
७.शब्दांतील ताकद.
बातम्या आणखी आहेत...