आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदीजी! छाती ठोकणे बंद करा, डोकलाममध्ये चीनकडून रस्तेबांधणी पुन्हा सुरु- राहुल गांधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डोकलामवरुन राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. चीनने पुन्हा एकदा डोकलामध्ये रस्ते निर्माण कार्य सुरु केले असल्याच्या बातम्या येत आहेत. राहुल गांधींनी ट्विट करुन म्हटले, 'मोदीजी, तुम्ही छाती ठोकणे बंद केले तर हे समजावून सांगण्याचे कष्ट घ्याल का? चीनने डोकलाम परिसरात पुन्हा रस्ते निर्माण सुरु केले, आधीच्या वादग्रस्त जागेपासून अवघ्या 12 किलोमीटरवर हे काम सुरु आहे.'  भारतीय अधिकाऱ्यांचा दावा आहे की चीन त्यांच्या रस्त्यांचे रुंदीकरण करत आहे. रस्ते रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 500 जवान तैनात करण्यात आले आहेत. 
 
चीनने डोकलाममध्ये फौज वाढवली 
- सूत्रांच्या माहितीनुसार, चीनने डोकलामध्ये हळु-हळु फौज वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सीमेवर पुन्हा तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. सूत्रांची माहिती आहे, की मागीलवेळी ज्या ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले होते त्यापासून अवघ्या 12 किलोमीटरवर चीने रस्ते निर्माण कार्य सुरु केले आहे. 

- भारताचे वायुदलप्रमुख बी.एस. धनोआ यांनी गुरुवारी म्हटले होते की चुंबी खोऱ्यात चीनी सैन्य हजर आहे. आम्हाला आशा आहे की त्यांचा युद्धाभ्यास पूर्ण झाल्यानंतर ते परत जातील. एअरफोर्सच्या वार्षिक पत्रकार परिषदेत धनोआ म्हणाले होते, की चीनी सैन्य चुंबी खोऱ्यात उपस्थित असताना भारत-चीन सैन्य आमने-सामने नाही.     
बातम्या आणखी आहेत...