आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरनाथ यात्रेची सुरक्षा लष्कराकडे द्यावी: विश्व हिंदू परिषदेची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी लष्कराकडे सोपवून द्यायला हवी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. विहिंपकडून यासंदर्भात जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोहरा आणि मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना पत्र लिहिण्यात आले आहे.
 
 
प्रवाशांसाठी द्रास-कारगील मार्गही सुरू केला जावा, असे विहिंपने म्हटले आहे. फुटिरवादी आणि दहशतवाद्यांकडून होत असलेल्या दगडफेकीमुळे लेह-कारगील-द्रास-बालटाल हा मार्ग खुला करण्यात यावा. शिवाय, हेलिकॉप्टरने प्रवास करणाऱ्या भाविकांना सेवाकर लावला जाऊ नये तसेच अमरनाथला जाणाऱ्या वाहनांकडून कोणतेही कर घेतले जाऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...