आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्र्याची पत्नी Infosys संचालकपदी, सोशल मीडियामध्ये उठले वादळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुनीता आणि जयंत सिन्हा. (फाइल फोटो) - Divya Marathi
पुनीता आणि जयंत सिन्हा. (फाइल फोटो)
नवी दिल्ली - देशातील दुसरी सुर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसने केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांची पत्नी पुनीता कुमार यांची कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीवरुन सोशल मीडियामध्ये चर्चा सुरु झाली आहे. काहींनी या नियुक्तीची तुलना पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी यांची आयकर विभागाच्या कायदेशीर सल्लागारपदी झालेल्या नियुक्तीच्या वादाशी केली आहे.

कोण आहेत पुनीता कुमार
अनेकांनी पुनीता कुमारांच्या बचावात म्हटले आहे, की जयंत सिन्हा यांच्या पत्नी असण्याआधी त्या एक इन्व्हेस्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. इन्फोसिसमध्ये त्यांची नियुक्ती 14 जानेवारी रोजी झाली. 53 वर्षांच्या पुनीता यांनी अमेरिकेच्या अनेक नामांकित कंपन्यांसोबत काम केले आहे.
आंतरराष्ट्रीय आणि वाढत्या बाजार विश्वामध्ये फंड मॅनेजमेंटचा त्यांचा 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी एसएकेएस मायक्रो फायनान्स, शोभा लिमिटेड यासारख्या कंपन्यांसोबत काम केले आहे. त्यांची स्वतःची पॅसिफिक पॅराडाइम अॅडव्हायजर ही अॅडव्हायजरी आणि मॅनेजमेंट फर्म आहे.

याआधी त्या ब्लॅकस्टोन ग्रुपच्या वरिष्ठ व्यवस्थापकिय संचालक नात्याने अब्जावधी डॉलरचा पोर्टफोलियो सांभाळत होत्या.

आयआयटी दिल्लीत झाली होती जयंत यांची भेट
पीएचडी आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाच्या वॉर्टन स्कूल ऑफ फायनान्स येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या पुनीता यांनी आयआयटी दिल्ली येथून केमिकल इंजिनिअरिंग केले होते. दिल्लीतील शिक्षणादरम्यान त्यांची जयंत सिन्हांसोबत भेट झाली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पुनीता यांचे आणखी फोटोज्...