आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CEO म्हणून काम करु शकत नव्हतो, विशाल सिक्कांनी Blog मधून मांडले राजीनाम्याचे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) विशाल सिक्का यांनी खुले पत्र आणि ब्लॉगच्या माध्यमातून राजीनाम्याचे कारण सांगितले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की गेल्या काही महिन्यांपासून अशी परिस्थिती तयार झाली होती, की सीईओ म्हणून मी काम करु शकत नव्हतो. सिक्का हे अनेक आरोपांचा सामना करत होते. ऑगस्ट 2014 मध्ये त्यांची इन्फोसिसमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली होती. सिक्का हे पहिले सीईओ होते जे संस्थापक सदस्यांपैकी एक नव्हते. त्यांच्यावर आरोप होता की कॉर्पोरेट गव्हर्नंन्स ते योग्य हताळत नव्हते. सिक्का यांच्या बड्या पॅकेजमुळेही ते निशाण्यावर होते. 
  
सिक्का यांनी ब्लॉगमध्ये दिले राजीनाम्याचे हे कारण 
- सिक्का यांनी लिहिले आहे, 'गेल्या काही महिन्यांपासून किंवा असे म्हणा की काही आठवड्यांपासून मी या निर्णयाचा विचार करत होतो. मी याबद्दलच्या बऱ्या-वाईट सर्व फायद्या तोट्यांचा विचार केला. आरोपांवर विचार केला आणि त्यावरील स्पष्टीकरणाचाही विचार केला. खूप विचार केल्यानंतर आणि गेल्या काही तिमाहींचा विचार केल्यानंतर या निर्णयावर ठाम राहाण्याचे निश्चित केले.'
 
हेही वाचा.. 
 
बातम्या आणखी आहेत...