आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाड केली व्यवस्थापकाने, पण नोकरी गमावली पीडितेने; हॉटेलचा अजब न्याय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीतील एअरोसिटीच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्थापकाने महिला कर्मचाऱ्याशी छेडछाड केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. सीसीटीव्हीत त्याचे फुटेजही आहे. पोलिसांनी त्यास अटक केली. न्यायालयात व्यवस्थापकाला जामीन मिळाला. हॉटेलने मात्र त्याच्यावर काही कारवाई करण्याऐवजी महिला आणि सीसीटीव्ही फुटेज देणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकले.  
 
सुरक्षा व्यवस्थापक पवन दहिया हॉटेलच्या स्वागतिका कक्षातील महिला कर्मचाऱ्याच्या साडीचा पदर आेढताना सीसीटीव्हीत दिसून येतो. दहियाजवळ एक कर्मचारीदेखील उभा होता, असे त्यात दिसून येते. मात्र नंतर त्यास बाहेर काढण्यात आले. ३३ वर्षांच्या पीडितेच्या म्हणण्यानुसार त्या दोन वर्षांपासून स्वागतिकेत नोकरी करत होत्या. मात्र, काही महिन्यांपासून दहिया त्यांना शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. २९ जुलै रोजी दहियाचा वाढदिवस होता. तेव्हा पवनने त्यांना त्याच्या कक्षात बोलावले आणि त्यांचा पदर आेढू लागला.
 
त्यादरम्यान खोलीत हॉटेलचा एक कर्मचारी दाखल झाला आणि संधी पाहून पीडित महिला त्याच्या तावडीतून निसटली. त्यानंतर पीडित महिला घरी जाण्यासाठी बाहेर पडली. तेव्हा पवन दहियाने तिचा पाठलाग केला. कारमध्ये बसवण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे महिलेने मेट्रो स्थानकावरून आपल्या एचआर विभागाला फोन केला. परंतु आरोपीच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर महिलेने १ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरील ठाण्यात व्यवस्थापकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पीडितेला न्याय मिळणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही.
बातम्या आणखी आहेत...