आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली : शाई फेकल्यानंतर PM ना भेटण्यासाठी आमदार राशीद यांचे धरणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान जम्मू काश्मीरचे आमदार राशीद (डावीकडे) यांच्यावर काही जणांनी शाई फेकली. - Divya Marathi
दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान जम्मू काश्मीरचे आमदार राशीद (डावीकडे) यांच्यावर काही जणांनी शाई फेकली.
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरचे अपक्ष आमदार इंजिनीअर राशीद देशाची हे दिल्लीमधील जम्मू-काश्मीर हाऊसबाहेर धरणे देत बसले आहेत. पंतप्रधानांचा भेटण्याच्या मागणीवर ते अडून आहेत. त्यापूर्वी सोमवारीच त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. ट्रकमध्ये बीफ ठेवल्याच्या अफवेवरून हत्या करण्यात आलेला ट्रक ड्रायव्हर जाहीद बट याच्या कुटुंबीयांबरोबर शाहीद दिल्लीमध्ये प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेत होते. त्यावेळी त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. या घटनेची जबाबदारी हिंदू सेनाने घेतली असून पोलिसांनी शाई फेकणाऱ्यांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये बीफची पार्टी देणाऱ्या राशीद यांना आमदारांनी विधानसभेत मारहाण केली होती.

काय म्हणाले होते राशीद
हल्ल्यानंतर मीडियाशी चर्चा करताना राशीद म्हणाले की, आम्ही आमचे म्हणणे मांडणे बंद करणार नाही. हा मोदी नव्हे गांधींचा देश आहे.

काय म्हणाला हल्लेखोर
हिंदू सेनेशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने मीडियाशी बोलताना सांगितले की, आम्ही राशीद यांच्यावर शाई फेकण्याचे कारण म्हणजे त्यांनी बीफची पार्टी दिली होती. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात अशी कृत्ये करत नाही.

काय केले होते राशीद यांनी
राशीद यांनी एमएलए हॉस्टेलमध्ये एक पार्टी दिली होती. या पार्टीमध्ये पाहुण्यांसाठी बीफ ठेवण्यात आले होते. राशीद यांच्या मते, कोणतेही कोर्ट किंवा विधानसभा त्यांना बीफ खाण्यापासून रोखू शकत नाही हा संदेश त्यांना द्यायचा होता. जम्मू-काश्मीर हायकोर्टाने राज्यात बीफवर बॅन लावला आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणावर विरोधही झाला होता. विरोध करणारे हा धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप असल्याचे म्हणत होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...