आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदियांवर फेकली शाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्यावर सोमवारी शाई फेकण्यात आली. ते नायब राज्यपाल नजीब जंग यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. जंग यांना भेटल्यानंतर माध्यमांशी बोलत असतानाच त्यांच्यावर शाई फेकण्यात आली.
या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिसोदिया म्हणाले की, भाजप व नायब राज्यपाल यांच्यात मिलीभगत आहे. त्यांच्या इशाऱ्यावरूनच हा प्रकार घडलेला आहे. विरोधकांकडे आता कुठलाही मुद्दा नाही तसेच कामही नाही. ते फक्त शाई फेकणे जाणतात. पण आम्ही आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा करू. दरम्यान, शाई फेकणाऱ्या संतप्त ब्रजेश शुक्ला याने म्हटले आहे की, आपचे नेते आमच्या पैशाने परदेशात जातात आणि दिल्लीत डेंग्यू आणि चिकुनगुन्याची साथ आली आहे. चिकनगुन्यामुळे १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...