आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई संरक्षणाविनाच ‘आयएनएस विक्रमादित्य’ भारताकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘आयएनएस विक्रमादित्य’ हे विमानवाहू लढाऊ जहाज रशियाहून मायदेशी परतीच्या मार्गावर कसलेही हवाई संरक्षण देण्यात आले नसून या जहाजाच्या संरक्षणासाठी भारतीय नौदलाने युद्धनौका पाठविल्या आहेत. भारतीय नौदलाने ‘विक्रमादित्य’चे हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी वादग्रस्त ‘बॅरक’ क्षेपणास्त्रांची निवड केली आहे.
भारतात पोहोचल्यानंतरच हे क्षेपणास्त्र विक्रमादित्यवर तैनात केले जाणार आहे. आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू लढाऊ युद्धनौकेला अंगभूत अशी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा नाही. आम्ही हे लढाऊ जहाज भारतात आल्यानंतर त्यावर बॅरक क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात करण्याचे ठरविले आहे, असे नौदल अधिका-याने सांगितले. आयएनएस विक्रमादित्यला विशिष्ट मार्गाने भारतातील तिचा मूळ तळ असलेल्या हिंदी महासागरात आणण्यासाठी संरक्षक युद्धनौकांचा ताफा रशियाकडे रवाना झाला आहे, असे त्यांनी सांगितले. नौदलाने विमानवाहू नौकांच्या संरक्षणार्थ बॅरक क्षेपणास्त्रांची केलेली निवडही वादग्रस्त आहे. सीबीआय सध्या 2006 मध्ये झालेल्या बॅरक क्षेपणास्त्र खरेदी गैरव्यवहारप्रकरणी तपास करत आहे.
अशी आहे विक्रमादित्य
रशियाची युद्धनौका अ‍ॅडमिरल गोश्कोर्व्हला भारतीय नौदलाने आयएनएस विक्रांत असे नाव दिले आहे. हे एक प्रकारे तरंगते शहरच आहे. 45 हजार टचन वजनाच्या या युद्धनौकेवर हवाई तळदेखील आहे. त्याची लांबी 284 मीटर तर रुंदी 60 मीटर आहे. हे तीन फुटबॉलच्या मैदानाइतके आहे. 20 मजली उंच इमारती इतकी या युद्धनौकेची उंची आहे. विक्रमादित्यवर 22 छत असून तेथे 1, 608 नौसैनिक तैनात असतील. विक्रमादित्य सलग 45 दिवस समुद्रात राहू शकते. त्याची इंधन क्षमता आठ हजार टन इतकी आहे.