आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Insulted Constitution, Agressive Responds On AAP Agitation

घटनेचा अपमान, उद्धटपणा; आपच्या आंदोलनाबद्दल संतप्त प्रतिक्रिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली,/बंगळुरू - चार पोलिस अधिका-यांच्या निलंबनाची मागणी करून दिल्लीकरांना वेठीस धरणा-या आम आदमी पार्टीविरुद्ध राजकीय पक्ष, दिल्लीकर नागरिक आणि अगदी त्यांच्याच पक्षातही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाच दिवसांवर असताना मुख्यमंत्र्यांसह अख्खे मंत्रिमंडळ रस्त्यावर उतरल्याने काँग्रेस, भाजपने टीकेची झोड उठवली.
प्रजासत्ताक दिन यशस्वी करण्याची जबाबदारी दिल्ली सरकारचीही आहे. आपचे आंदोलन म्हणजे घटनेचा अपमान आहे, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री मनीष तिवारी म्हणाले, तर मुख्यमंत्र्यांना हे शोभत नाही. हा निव्वळ प्रसिद्धी स्टंट असल्याचा आरोप तिवारी यांचे सहकारी व केंद्रीय मंत्री जी. के. वासन केला. केजरीवाल यांनी केंद्र सरकारशी चर्चा क रून घटनात्मक मार्गाने तोडगा काढला पाहिजे, मुख्यमंत्रिपदाचा मान राखला पाहिजे, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह म्हणाले.
सौजन्याची ऐशीतैशी
राजकीय दु:साहस, उद्धटपणा आणि सार्वजनिक ठिकाणी सौजन्याची ऐशीतैशी करून ‘आप’ने देशातील कायद्याबद्दल अजिबात आदर नसल्याचे दश्रवले आहे. केजरीवाल माओवाद्यांसारखी भाषा वापरत आहेत. कारभार कसा हाकावा हेच त्यांना कळेनासे झाले आहे, असे भाजप नेते अरुण जेटली म्हणाले.
केजरीवाल मंत्रिमंडळाने कार्यालयात बसावे
केजरीवाल व त्यांच्या मंत्रिमंडळाने कार्यालयात बसून कारभार केला पाहिजे. केवळ कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आंदोलन करावे, असा सल्ला आपचे सदस्य व उद्योगपती कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांनी दिला आहे. कनिष्ठ स्तरावरील अधिका-यांच्या हकालपट्टीसाठी केजरीवालांनी धरणे आंदोलनाचा मार्ग पत्करून स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेतल्याचेही अनेकांचे मत आहे, असे गोपीनाथ म्हणाले.