आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Insurance Policey To Woman For The Family Planing

फॅमिली प्लॅनिंगसाठी महिलांना विमा संरक्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोकरी करणा-या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. फॅमिली प्लॅनिंग आणि त्यानंतर मुलांच्या संगोपनासाठी नोकरीतील ब्रेकमुळे होणारी या महिलांची आर्थिक चणचण आता मिटणार आहे. महिलांच्या बाळंतपणाच्या काळातील आर्थिक संरक्षणाशी संबंधित विमा उत्पादन तयार करण्यासाठी सध्या आयुर्विमा कंपन्या काम करत आहेत. सध्याचा काळ पाहता अशा विमा उत्पादनाची गरज असल्याचे मत विमा कंपन्यांनी व्यक्त केले आहे.
एगॉन रेलिगेअरचे सीओओ यतीश श्रीवास्तव यांनी सांगितले, विशिष्ट क्षेत्राशी निगडित गरजानुसार उत्पादने तयार करण्यावर कंपनी भर देत आहे. मात्र, एखाद्या विशिष्ट क्षेत्राशी संबंधित आकडेवारी आणि गरजा या माहितीचा अभाव ही यातील सर्वात मोठी अडचण आहे. अशा प्रकारच्या उत्पादनासाठी आवश्यक असणारी आकडेवारी आणि विविध आर्थिक पैलूंचा कंपनीकडून अभ्यास सुरू आहे. यतीश यांच्या मते, विशेषकरून महिलांना होणा-या सर्व्हायकल कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) यासारख्या आजारांसाठी विशेष विमा उत्पादनाची गरज आहे. भारतात स्टँड अलोन आरोग्य विमा कंपन्यांनी महिलांसाठी क्रिटिकल कव्हर देणारी उत्पादने सादर केली आहेतच. आता आयुर्विमा कंपन्या या क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत. एचडीएफसी स्टॅँडर्ड लाइफ इन्शुरन्सचे उपाध्यक्ष (उत्पादने आणि धोरण) संजय तिवारी यांनी सांगितले, आता ग्राहकांचे वय आणि त्यांच्या खास गरजा लक्षात घेऊन विमा उत्पादने तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या विमा उत्पादनांचे पर्याय मिळतील.
आणि आपल्या गरजेनुसार ते निवडण्याची मुभा मिळेल.