आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाऊदचा पाकमधील नवा पत्ता, मोरी राेड, गुप्तचर यंत्रणेचा कॉल रेकॉर्डआधारे दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने त्याचा ठावठिकाणा बदलला असून तो आता रावळपिंडी व इस्लामाबाद हायवेवरील डिफेन्स एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरी रोड येथे वास्तव्यास गेला आहे. या ठिकाणीच आयएसआयचे एक मोठे कार्यालयदेखील आहे. अमेरिका व भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी दाऊदवर पाळत ठेवली असून त्याच्या गेल्या ४५ दिवसांतील कॉल डिटेल्स व टॅपिंगच्या आधारे काही माहिती गोळा केली आहे. त्याआधारे गुप्तचर यंत्रणेने हा दावा केला आहे.

डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असून भारताने त्याबाबतचे पुरावे पाकला अनेकदा सादर केले होते. त्याला ताब्यात देण्याची मागणी भारत सातत्याने करत आला आहे. दाऊद इब्राहिम सुरुवातीला कराची व तीन सिंध प्रांतात दोन ठिकाणी तो राहत असे. परंतु ही सर्व ठिकाणे त्याने सोडून िदली आहेत. सूत्रांनुसार दाऊदने मोरी रोडवर एक फार्महाऊस खरेदी करणार असून तो तेथे राहणार आहे. दाऊदच्या कॉल रेकॉर्डआधारे मिळालेली सर्व माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली असून ते ती पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथ सिंह यांना देणार आहेत. तसेच डोभाल काही पुरावेही नेत्यांना देणार आहेत. त्याआधारे दाऊद पाकमध्येच असून तो कुठेही गेला नाही हे सिद्ध करता येऊ शकेल.

आयएसआय टॅक्स घेऊन पुरवते सुरक्षा
कॉल डिटेल्स व टॅपिंगच्या आधारे असे लक्षात आले अाहे की, दाऊदने गेल्या एक महिन्यापासून सौदी अरेबिया, शारजा व बांगला देशातील त्याची संपत्ती, त्याचा किराया व धंद्याबाबत बोलणी केली आहे. दुबईमध्ये फिक्सिंग, अंमली पदार्थ व प्रॉपर्टीचे काम जावेद पाहतो आहे. भारताच्या दबावामुळे आयएसआयने दाऊदच्या सुरक्षेपोटी घेतल्या जाणाऱ्या रकमेवर टॅक्स वाढवला आहे. दाऊदला १८ गाड्यांचा सुरक्षा ताफा देण्यात आला आहे. त्यात जॅमरयुक्त गाड्यांशिवाय बुलेटप्रूफ गाड्या व शॅडो गाडीचाही समावेश आहे.
डाॅनकडे १२ पासपोर्ट
सूत्रांच्या माहितीनुसार दाऊद केवळ सायंकाळी व रात्रीचा सक्रिय असतो. त्याने दिवसाच्या हालचाली बंद केल्या आहेत. दाऊदकडे १२ पासपोर्ट आहेत. त्यात सहा भारतीय, चार पाकिस्तानी व दोन दुबईच्या पासपोर्टचा समावेश आहे. दाऊदवर लक्ष ठेवणाऱ्या टीमने हा दावा केला आहे. त्याने आता सायप्रस व दक्षिण आफ्रिकेतील देशांमध्ये नवी ठिकाणे शोधण्यास सुरुवात केली आहे.
बातम्या आणखी आहेत...