आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात धार्मिक दंगली पेटवण्‍याची ISI ची योजना, घेणार IM ची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात धार्मिक हिंसाचार वाढावा, या उद्देशाने दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीनच्‍या माध्‍यमातून भारतातील धार्मिक स्‍थळांवर हल्‍ला करण्‍याची योजना पाकिस्‍तानी गुप्‍तचर संस्‍था आयएसआय आखत आहे, असा दावा भारतीय गुप्‍तचर संस्‍थेच्‍या आधारे एका इंग्रजी वृत्‍तपत्राने केला आहे.
या वृत्‍तानुसार, आयएसआयच्‍या निशाण्‍यावर सध्‍या पंजाब असून, मागील महिन्‍यांतच धार्मिक ग्रंथाची पाने फाडल्‍याने पंजाबमध्‍ये दंगल उसळली होती.
सीमावर्तीय भागाला करणार लक्ष्‍य
सूत्रांनुसार, जी राज्‍ये पाकिस्‍तानच्‍या सीमेलगत आहे त्‍या राज्‍यातील धार्मिक स्‍थळांवर हल्‍ला करून दंगल पसरवण्‍याची योजना आयएसआय आखत आहे. यामध्‍ये पंजाब आणि जम्मू-कश्मीर ही राज्‍य असू शकतात. या हल्‍लासाठी आयएसआय इंडियन मुजाहिदीनच्‍या फरार असलेल्‍या दहशतवाद्यांच्‍या संपर्कात आहे. त्‍यामुळे भारतीय गुप्‍तचर संस्‍थांनी या दोन्‍ही राज्‍यातील डीजीपीला याची सूचना दिली आहे. शिवाय सर्तक राहण्‍याचे आवाहनही केले आहे.
उत्‍तर प्रदेश आणि हरियाणासुद्धा टार्गेटवर
पंजाब आणि जम्मू-कश्मीरशिवाय हरियाणा आणि यूपीमध्‍ये आयएसआय धार्मिक दंगल पेटवण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. त्‍यामुळे सर्तक राहण्‍याचे आदेश दिले गेले.
बातम्या आणखी आहेत...