आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Intelligence Report Claims Umar Khalid Had Planned Afzal Show Across 18 Universities

JNU वाद : लखनौमध्‍ये भाजप-कॉंग्रेस कार्यकर्त्‍यांची एकमेकांवर दगडफेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - कॉंग्रेस उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांना भाजपच्‍या कार्यकर्त्‍यांनी काळे झेंडे दाखवले. दरम्‍यान, यामुळे तणाव निर्माण होऊन भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्त्‍यांमध्‍ये हाणामारी झाली. शिवाय दोन्‍ही गटांकडून दगडफेक करण्‍यात आली. परिस्‍थ‍िती नियंत्रणात आणण्‍यासाठी पोलिसांनालाठीमार करावा लागली.

का आले होते राहुल गांधी लखानौमध्‍ये
- राहुल गांधी दलितांच्‍या संमेलनात भाग घेण्‍यासाठी आले होते. कॉंग्रेसच्‍या कार्यलयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.
- येथून अमेठीकडे जाणार आहेत.
दलितांना आपल्‍याकडे आकर्षित करण्‍याचा प्रयत्‍न...
- उत्‍तरप्रदेशमध्‍ये पुढच्‍या वर्षी विधानसभा निवडणूक आहे. त्‍या दृष्‍टीने राहुल यांचा हा दौरा अत्‍यंत महत्‍त्‍वाचा मानला जात आहे.
- 2014 च्‍या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला यूपीमधून एकाही जागेवर विजय मिळला नव्‍हता.
- बसपकडून नाराज झालेल्‍या दलित मतदारांना कॉंग्रेसचा आपल्‍याकडे आकर्षित करण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे.
राहुल यांनी घेतली राष्‍ट्रपतींची भेट
जेएनयूमधील देशविरोधी घोषणाबाजीचा वादनंतर भाजप व कॉंग्रेसमध्ये जुंपली आहे. कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली.

देशप्रेम हे माझ्या रक्तात व ह्रदयात- राहुल गांधी
देशासाठी माझ्या कुटुंबियांनी बलिदान दिले आहे. देशप्रेम हे माझ्या रक्तात व ह्रदयात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. देशविरोधी घोषणाबाजी करणार्‍यांवर कठोर कारवाई झालीच पाहिले. मात्र, जेएनयूच्या विद्यार्थ्यांना विनाकारण बदनाम केले जात असल्याचे राहूल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

देशद्रोहाच्या आरोपाखाली विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला अटक अटक झाली आहे. त्याला विरोध करण्‍यासाठी आपण जेएनयूमध्ये गेलो होतो. कन्हैयाकुमारवरील आरोप अद्याप सिद्ध झाले नसल्याचे राहुल यांनी सांगितले.

देशविरोधी घोषणा देणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे- केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जेएनयू प्रकरणावर राष्ट्रपती प्रणब मुखर्जींची भेट घेतली. देशविरोधी घोषणा देणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही केजरीवाल यांनी केली आहे.

JNU चे महराष्ट्र कनेक्शन? 'त्या' रॅलीचे नेतृत्त्व करणार उमर खालिद फरार
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) देशविरोधी घोषणाबाजीप्रकरणी नवा व धक्कादायक खुलासा समोर आला आहे. इंटेलिजन्स ब्यूरोने (IB) हा खुलासा केला आहे. संसदेवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी अफजल गुरूच्या समर्थनार्थ देशातील 18 यूनिव्हर्सिटीमध्ये कार्यक्रम घेण्यात येणार होते, असा IB ने खुलासा केला आहे.

जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद याच्याकडे अफजलच्या कार्यक्रमाची जबाबदारी सोपवण्यासाठी होती. खालिद सध्या फरार असून तो महाराष्‍ट्रातील अमरावती जिल्ह्यातील तळेगाव येथील राहाणारा आहे. त्यामुळे जेएनयू प्रकरणाचे महाराष्‍ट्राशी काही कनेक्शन आहे? याचा शोध घेण्यात येत आहे.

IB च्या अहवालात कन्हैया कुमारचे नाव नाही
IB ने दिलेल्या अहवालात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्‍यात आलेला कन्हैया कुमारचे नाव नाही.

अफजल गुरुच्या समर्थनार्थ देशातील 18 यूनिव्हर्सिटीजमध्ये कार्यक्रम घेणार होता खालिद
- 'मेल टुडे'च्या रिपोर्टनुसार, उमर खालिद याने अफजल गुरुच्या समर्थनार्थ देशभरात कार्यक्रम घेण्याचा कट रचला होता. त्याने या कामासाठी काश्मीरमधील एका पथकाला बोलावले.
- जेएनयू कॅम्पसमध्ये देशविरोधी घोषणा उमर खालिदच्या साथिदार्‍यां द‍िल्या होत्या. काश्मीरमधून आलेल्या युवकांना जेएनयूमध्ये ठेवण्यात आले होते.
- उमर हा तिहार तुरुंगात कैद असलेला दिल्ली यूनिव्हर्सिटीचा माजी प्राध्यापक जीएन साईबाबाचा नातेवाइक असल्याचे गुप्तचर संघटनेने म्हटले आहे.


बुधवारी दिवसभर नाट्यमय घडामोडी...
> याप्रकरणी बुधवारी दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या.
> सकाळी कन्हैयाच्या सुनावणीसाठी कोर्टात पोलिस, वकील, मीडिया आणि आंदोलकांची मोठी गर्दी होती. दरम्यान, दुपारी दीड वाजता कोर्ट परिसरात कन्हैया समर्थक व विरोधी वकिलांमध्येच जुंपली.
> या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शनतत्त्वे जारी केले. सुनावणीच्या वेळी कोर्ट रूममध्ये पाच व संपूर्ण परिसरात 25 पेक्षा जास्त पत्रकार असू नयेत. कोर्ट रूममध्ये कन्हैयाचे कुटुंबीय व जेएनयूचे दोन अध्यापक असावेत, असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते.
> कन्हैयाला पोलिस बंदोबस्तात कोर्टात आणले गेले. मात्र, कोर्ट बाहेरच त्याच्याच्यावर वकीलांच्या एका गटाने हल्ला केला. त्याला बेदम मारहाण केली.
> कन्हैयाला मारहाण झाल्याचे वृत्त कळताच सुप्रीम कोर्टाने पतियाळा हाऊस कोर्टातील कार्यवाही रोखण्याचे आदेश दिले. सहा वकिलांच्या पथकाला परिस्थितीची माहिती घेण्यासाठी पाठवले.

SC च्या वकीलांना संबोधले पाकिस्तानी एजन्ट...
- कन्हैया कुमारला प‍तियाळा हाऊस कोर्ट परिसरात मारहाण झाली. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता सुप्रीम कोर्टने पाच वकीलांची एक टीम पतियाला हाऊस कोर्टात पाठवले.
- यात कपिल सिब्बल, राजीव धवन, दुष्यंत दवे, एडीएन राव व अजीत सिन्हा यांचा समावेश होता.
- सुप्रीम कोर्टाच्या वकीलांची टीम पतियाळा हाऊस कोर्टात पोहोचली असता त्यांना अज्ञात व्यक्तिंनी पाकिस्तानी एजन्ट म्हणून संबोधले. शिवीगाळही केली. मारहाण करण्याचाही प्रयत्न केला.

पुढील स्लाइडवर वाचा कोण आहे उमर खालिद?