आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Intercepted Dawood Calls Prove Yet Again He Is In Pakistan

दाऊद पाकिस्तानातच, इन्टरसेप्टेड कॉल्सने झाले स्पष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय गुप्तचर संस्थेने (आयबी) पुन्हा एकदा दावा केला आहे, की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्याला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे संरक्षण आहे. आयबीने त्याचे फोन कॉल्स ट्रेस केले असल्याचा दावा केला आहे.
दुबईतील सहकाऱ्यांना केले होते फोन
सूत्रांच्या माहितीनूसान जवळपास चार महिन्यांआधी दाऊदने त्याचा सहकारी जावेदला दुबईला तीन फोन केले होते. जावेद दुबई आणि भारतात त्याच्या रिअल इस्टेटसह सगळ्या अवैध धंद्यावर लक्ष ठेवतो. त्यात ड्रग्स, खंडणी आणि हवाला यांचा समावेश आहे. जावेदने दाऊदशी बोलण्यापूर्वी तीन महिन्यांआधी तारिक नावाच्या एका व्यक्तीला फोन केला होता. या सर्व कॉल्समध्ये त्यांच्या धंद्याबद्दल चर्चा झाली होती. तारिक हा दाऊदचा उजवा हात समजला जात होता. त्याला उत्तर प्रदेश एटीएसने एकदा अटकही केली होती.
दाऊद प्रकरणावर डोभाल यांची नजर
एनएसए अजीत डोभाल हे स्वतः दाऊद प्रकरणावर नजर ठेवून आहेत. ते देशातील सर्वोच्च संरक्षण संस्थांसोबत स्वतः संपर्क ठेवून आहेत. अंडरवर्ल्ड प्रकरणाचे तज्ज्ञ म्हणून डोभाल प्रसिद्ध आहेत. दाऊद प्रकरणात ते रॉच्याही संपर्कात आहेत. दाऊदच्या संपत्तीवर टाच आणण्याची मागणी सतत होत आहे. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या दिशेने पावले उचलली जात आहेत.