आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनयू : वातावरण बिघडवण्यास उमर, अनिर्बाण दोषी, चौकशी समितीचा निष्कर्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जेएनयूच्या चौकशी समितीने उमर खालिद आणि अनिर्बाण भट्टाचार्य यांना विद्यार्थ्यांमध्ये सांप्रदायिक, जातीय आणि प्रांतीय भावना भडकावल्याबद्दल दोषी ठरवले आहे. त्यांना वातावरण बिघडवण्याबद्दलही दोषी धरण्यात आले.

उमर आणि अनिर्बाण यांना तिहार तुरुंगाच्या महानिरीक्षकांमार्फत पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशीत चार आरोपांबद्दल दोषी ठरवण्यात आले. अनिर्बाणला दिलेल्या नोटिशीनुसार त्याला विद्यापीठात खोटे प्रमाणपत्र व खोटी माहिती दिल्याबद्दल दोषी ठरवले आहे. त्याचबरोबर बाहेरील लोकांना अनधिकृत प्रवेश आणि विद्यापीठ परिसरातील भागात अवैध कब्जा करण्याबद्दलही दोषी ठरण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, उमरवरही असेच आरोप आहेत.
चौकशी समितीने विद्यापीठाचे नियम आणि शिस्तभंग केल्याबद्दल ज्या २१ विद्यार्थ्यांना दोषी ठरवले आहे त्यात अनिर्बाण आणि उमर यांचाही समावेश आहे. समितीने विद्यार्थी संघटनेतील अभाविपचे एकमेव सदस्य आणि संयुक्त सचिव सौरभ शर्मा यांना कार्यक्रमाच्या दिवशी वाहतूक रोखण्याबद्दल दोषी ठरवले आहे. सौरभनेच देशविरोधी घोषणांची तक्रार पोलिसांत केली होती.