आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Cargo Terminal At Pune Airport Environment Minister Prakash Javdekar

पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय एअर कार्गो टर्मिनल - पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय एअर कार्गो टर्मिनल उभारण्याची मान्यता मिळाली असून त्यासाठी २ हजार २१३ चौरस मीटर जागा उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय कार्गो व्हावा यासाठी जावडेकर यांनी सातत्याने प्रयत्न केले होते.
नागरी हवाई वाहतुक मंत्री अशोक गजपती राजू यांनी जावडेकर यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलला मान्यता देण्यात येत असल्याचे कळविले आहे. टर्मिनल स्थापनेसाठी कस्टम विभागाकडून तत्वत: मान्यता मिळाल्याची प्रतिक्षा आहे.