आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत सरकारला यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेस आंतरराष्ट्रीय न्यायालयाने काल (मंगळवारी) स्थगिती दिल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

पाकिस्तानच्या न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपावरून जाधव यांना गेल्या महिन्यात फाशीची शिक्षा सुनावली होती. जाधव भारतीय नौदलातून निवृत्त झाले असून त्यांचा सरकारशी काहीही संबंध नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. 

जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी इराणहून परतल्यानंतर बलुचिस्तानमध्ये अटक केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तान लष्कराने त्यांच्या कबुलीजबाबाचा व्हिडिओही जारी केला होता. मात्र, भारताने पाकिस्तानचे आरोप फेटाळले आहेत. जाधव यांचे पाकिस्तानने अपहरण केल्याचा भारताचा दावा आहे. 

दरम्यान, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपण कुलभूषण जाधव यांच्या आईशी बोललो असल्याची माहिती ट्विटरवर दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी भारताची बाजू मांडली आहे. 
 
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी 25 एप्रिल रोजी जाधव यांच्याविरुद्ध दाखल आरोपपत्राची प्रत मिळाली नसल्याचे सांगत त्यांचा कोर्टात बचाव कोणी केला हेही माहिती नसल्याचे म्हटले होते. 

पुढील स्लाइडवर वाचा... यामुळे पाकवर दबाव येऊ शकतो...
 
बातम्या आणखी आहेत...