आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. दुसर्या टप्प्यातील मतदान बुधवारी (9 एप्रिल) शांततेत पार पडले. आसाम आणि त्रिपुरानंतर अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय आणि नागालॅंडमध्ये मतदात झाले. परंतु भारतीय प्रसारमाध्यमे उत्तर-पूर्व राज्यातील मतदानाच्या घटनांना दुय्यम स्थान देताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणज या राज्यातून असा एकही मोठी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली नाही. दुसरीकडे विदेशी मीडियाने लोकसभेच्या महासंग्रामाच्या प्रत्येक घटनेवर लक्ष केंद्रित केले आहे. मंगळवारी (8 एप्रिल) आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना एका रिक्षाचालकाने थप्पड लगावल्याच्या घडनेने खळबळ माजली आहे. अरविंद केजरीवाल यांना थप्पड लगावल्याच्या वृत्ताची ब्रिटन आणि मध्यपूर्व देशातीत वृत्तपत्रांनी प्रामुख्याने दखल घेतली आहे.
एक दिवसापूर्वी अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र 'वाशिंग्टन पोस्ट'च्या संपादकीय लेखात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा तोंडभरून कौतुक केले होते. विदेशी मीडिया नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्याकडे सर्वाधिक लक्ष देत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, विदेशी मीडियात बुधवारी कोणत्या वृत्ताला मिळाले महत्त्व...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.