आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Election Result : Internation Media Covorage On Delhi Election

पाकिस्तानात \'AAP\'च्या विजयाऐवजी मोदींच्या पराभवाची सर्वाधिक चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवालांच्या 'आप'चा ऐतिहासिक विजय झाला आहे. केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर भाजपने देशात झालेल्या जवळपास सर्वच निवडणुकांमध्ये विजय नोंदवला होता. मात्र, दिल्लीत 'आप'ने भाजपचा 'विजयरथ' रोखला आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे देशासह अन्य राष्ट्रांचे लक्ष लागले होते. पाकिस्तानमध्ये तर 'आप'चा विजय सोडून भाजपचा पराभव अर्थात नरेंद्र मोदींच्या पराभवाची चर्चा सुरु आहे.

दिल्लीतील 'AAP' च्या या ऐतिहासिक विजयाच्या आवाजाची दखल आंतरराष्ट्रीय मीडियाने देखील घेतली असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. हफिंगटन पोस्टने 'AAP' ला 'किलर' असे संबोधले आहे. तर, गार्जियनने लिहिले आहे की, भ्रष्टाचार विरोधी पार्टीने दिल्ली निवडणुकांमध्ये मोदींना जबरदस्त झटका दिला आहे.पाकिस्तानचे वृत्तपत्र 'द डॉन' ने 'AAP' च्या विजयानंतर हा मोदींचा पराभव असल्याचे म्हटले आहे.
वाचा, दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर अंतरराष्ट्रीय मीडियाने काय भाष्य केले आहे.
'द डॉन'

हेडिंग- Narendra Modi concedes defeat in Delhi state election
पाकिस्तानातील प्रमुख वर्तमानपत्र म्हणून ओळख असलेल्या 'द डॉन' ने असे म्हटले आहे की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप' च्या विजयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव असल्याचे म्हटले आहे. रिपोर्टमध्ये असे देखील लिहिले आहे की, भाजपाला या निवडणूकीत मोठा पराभवाचा सामना करावा लागला आहे. केंद्रात सत्तेत आल्यानंतरचा भाजपाचा हा पहिलाच पराभव असल्याचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.
दरम्यान, डॉनने भ्रष्टाचार विरोधी प्रचारक अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या जबरदस्त विजयानंतर मोदींनी केलेल्या ट्वीटचा देखील उल्लेख केला आहे. यामध्ये मोदींनी केजरीवाल यांचे अभिनंदन केले असून दिल्लीच्या विकासात केंद्राकडून पूर्ण मदत दिली जाईल असा विश्वास दाखवला आहे.
पुढे वाचा, दिल्ली विधानसभा निवडणुकीवर इतर मीडियाचे काय मत आहे...