आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Yoga Day: Baba Ramdev Conducts Mega Rehearsal As Participants Look To Set World Record

आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी रामदेवबाबांची जय्यत तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- येत्या २१ जून राेजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त दिल्लीत राजपथावर साजऱ्या होणाऱ्या समारंभात सहभागी होण्यासाठी योगगुरू रामदेवबाबांनी आपल्या पतंजली योगपीठाचे ५२०० शिक्षक, काही लोक व मुलांकडून सराव करून घेतला. आयुष मंत्रालयाने ठरवून दिलेल्या शिष्टाचारानुसार हा सराव करण्यात आला.

सकाळी राजधानीत पाऊस असतानाही हे हजारो लोक जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर उपस्थित होते. रामदेवबाबा यांनीही या वेळी काही ठरावीक योगासने सादर केली. निरोगी आयुष्यासाठी आवश्यक असलेली ही योगासने नियमित करणे अत्यावश्यक असल्याचे रामदेवबाबा म्हणाले. योगासनाच्या या सत्राला इमामांच्या संघटनेचे सरचिटणीस सहमून कासमी यांचीही उपस्थिती होती, अशी माहिती रामदेवबाबा यांचे प्रवक्ते एस. जे. तिजरेवाला यांनी दिली. पतंजली योगपीठाने आंतरराष्ट्रीय योगदिनी जगभरातील अनेक देशांत कार्यक्रमांचे आयोजन केले असून काही देशांत योगदिनाच्या कार्यक्रमाचे विशेष प्रक्षेपण करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने याेगदिनाला मंजुरी दिल्यानंतर जगातील १९१ देशांत हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.

टाइम्स स्क्वेअर नटले
२१ जून रोजी अमेरिकेत टाइम्स स्क्वेअरवर आंतरराष्ट्रीय योगदिनी विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज उपस्थित राहणार असून उत्तर हिंदू मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमालही भरगच्च असेल.

दूरदर्शनवर प्रक्षेपण
२१ जूनला राजपथावर होणाऱ्या योगदिनाच्या भव्यदिव्य समारंभाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण करण्यात येईल. प्रजासत्ताकदिनी केल्या जाणाऱ्या प्रक्षेपणाच्या धर्तीवर योगदिनाचे इत्थंभूत वर्णन यात असेल.