आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CARTOONS मधून योग डे: मोदींचे घुमक्कडासन, तर राहुल यांचे फिसलासन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतासह संपूर्ण देशात आज आंतरराष्‍ट्रीय योग दिवस मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. नरेंद्र मोदी यांनी चंदीगडमध्‍ये योग प्रोग्राममध्‍ये सहभाग घेतला. इतर मंत्री विविध शहरांमध्ये आसनं करताना दिसून आलेत. योग दिवसाला विदेशातूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यानिमित्‍ताने dainikbhaskar.com चे व्‍यंगचित्रकार हरिओम तिवारी यांनी 7 व्‍यंगचित्र काढले आहेत. ते आम्‍ही आपल्‍याला या संग्रहात दाखवत आहोत. अशी आहेत आसनं..
1. राहुल गांधी आणि फिसलासन
- नुकत्‍याच झालेल्‍या विधानसभा निवडणुकांमध्‍ये कॉंग्रेसच्‍या मतांमध्‍ये घसरण झाली. त्‍यामुळे राहुल यांच्‍या नेतृत्‍वाबाबत प्रश्‍न उपस्‍थित झाले. दुसरीकडे सोनिया राहुल यांच्‍याकडे पक्षाची धुरा सोपवण्‍याचा विचार करत आहेत. मात्र, राहुल वारंवार घसरत आहेत.
2. मोदी आणि घुमक्कडासन
- नरेंद्र मोदी आताच अमेरिकेच्‍या दौ-याहून आले. लवकरच ते उजबेकिस्तान आणि 5 अफ्रीकी देशांमध्‍ये दौ-यावर जाणार आहेत. विरोधक त्‍यांना 'उडता पीएम' म्‍हणतात. त्‍यांचे विदेश दौरे नेहमी विरोधकांच्‍या कात्रित सापडले आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍यासाठी हे घुमक्कडासन ठीक राहील.
3. राजन आणि धक्कासन
आरबीआयचे चीफ रघुराम राजन यांनी सेकंड टर्म घेण्‍यासाठी मनाई केली. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींची त्‍यांच्‍याविरोधातील लॉबिंग पाहून त्‍यांनी माघार घेतली. त्‍याच्‍या समर्थनात अनेक जण आहेत. त्‍यामुळे राजन यांच्‍यासाठी हे धक्‍कासन उत्‍तम राहिल.
4. केजरीवाल आणि डंडासन
- मोदी सरकार आणि अरविंद केजरीवाल यांच्‍यात नेहमी वाद राहिला आहे. परस्‍परांमधील वादामुळे ते नेहमीच मोदी सरकारवर भडकताना दिसतात. मोदी सरकारवर विविध आरोप करतात. दिल्‍लीमध्‍ये डंडा त्‍यांचाच चालेल अशी त्‍यांची भूमिका आहे.
5. महागाई आणि टमाटरासन
- एकीकडे सरकार लोकांकडून योग करुन घेत आहे, दुसरीकडे टमाटर आणि दाळ महागाई वाढवत आहे. टमाटर शंभर रुपयांच्‍या जवळपास पोहोचले आहेत. दाळ आधीच 200 रुपयांच्‍या पार आहे.
6. वोट लपकासन
- यूपीमध्‍ये 2017 च्‍या विधानसभा निवडणूकांची तयारी जोरदार सुरू आहे. बीजेपी, सपा, बसपा आणि कॉंग्रेस आपल्‍या खिशात मत पाडून घेण्‍यासाठी प्रयत्‍न करत आहेत. ही पूर्ण कवायत म्‍हणजे जणू वोट लपकासनच आहे.
7. बेटासन
- कायदेशीर निर्बंधांमुळे लालूंनी विधानसभा निवडणूक लढवली नाही. मात्र, दोन्‍ही मुलांना त्‍यांनी सरकारमध्‍ये जागा दिली. एक उपमुख्यमंत्री तर, दुसरा मुलगा मंत्री बनला. आपले मुलच राजकीय वारस राहतील असेही राबडी देवी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. राजनाथ यांच्‍या पुत्रप्रेमावरही अशी चर्चा होत आहे. राजनाथ सिंह त्‍यांचा मुलगा पंकज यांना यूपीच्‍या भाजपचा चेहरा बनवण्‍याच्‍या तयारीत आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, अशी आहेत विविध आसनांची कार्टून..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...