आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INT YOG DAY : 35 हजारांवर नागरिक उपस्थित; \'राजपथ बनले योगपथ\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताच्या नेतृत्वात 191 देशांतील 251 शहरांमध्ये रविवारी सामुहिक योगाला सुरुवात झाली. दिल्लीत राजपथावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळीच पोहोचले. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, राजपथ एकदिवस योगपथ बनेल असा विचारही कोणी केला नसेल. राजपथावर योगाच्या सुरुवातीला ओमचा उच्चार करण्यात आला. त्यावेळी मुस्लीम बांधवांनी अल्लाहचे नाव घेतले.
राजपथावर उपस्थित नागरिकांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही योगाभ्यास केला. पंतप्रधान योग करणार नाही, असे आधी सांगण्यात आले होते. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी योगदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला तमाशा म्हणून संबोधले आहेत. तर राजपथावर योगाच्या सुरुवातीला ओमचा उच्चार करण्यात आला. त्यावेळी मुस्लीम बांधवांनी अल्लाहचे नाव घेतले.
न्यूझीलंडच्या ऑकलंड, तैवानसह इतर काही देशांमध्येही सामुहिक योग कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भारतामध्ये सूर्यनमस्कारावरून वाद असला तरी तैवानमध्ये योगादरम्यान सूर्य नमस्कारही करण्यात आला.
काय म्हणाले पंतप्रधान
नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले की, योगा हा आपल्या आंतरिक मन आणि आंतरिक ऊर्जेला विकसित करण्याचे साधन आहे. काही लोकांना वाटते की, योग म्हणजे शरीर कोणत्याही प्रकारे वाकवणे हे असते. पण तसे नाही. कारण तसे असते तर सर्कसमधील काम करणारी मुलेही योगी म्हणून मिरवली असती. जगात ज्याठिकाणी सूर्य सर्वात आधी पोहोचतो आणि ज्याठिकाणी सर्वात शेवटी पोहोचतो सगळ्यांनी योगाचा स्वीकार केला आहे, हे जगालाही मान्य करावे लागेल. '
पहाटे चारपासून मेट्रो सुरू
दिल्लीमध्ये सकाळी चार वाजेपासून मेट्रो सुरू झाली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी सकाळी चार वाजेपासूनच लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे लोकांना योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

गिनीज बुकात नोंद...
एका ठिकाणी सर्वाधिक लोकांनी केलेल्या योगाच्या विक्रमाची नोंद गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये केली जाण्याची शक्यता आहे. राजपथावरील या सोहोळ्याची नोंद करण्यासाठी गिनीज बूकच्या टीमलाही आमंत्रित करण्यात आले होते. संपूर्ण सोहळ्यादरम्यान या टीमने राजपथावर पाहणी केली. रात्रीपर्यंत विक्रम झाला किंवा नाही याबाबत स्पष्ट माहिती मिळणार आहे.

यापूर्वीचा विक्रम
सामुहिकरित्या योगा करण्याचा यापूर्वीचा विक्रम विवेकानंद केंद्राच्या नावावर आहे. त्यावेळी 29,973 लोकांनी एकावेळी योगा केला होता. राजपथावर 35,000 पेक्षाही अधिक लोकांनी योगा केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच राजपथावर एकाचवेळी 50 देशांच्या नागरिकांनी एकाचवेळी योगा केल्याचा विक्रमही होऊ शकतो.
राजपथावर केलेली 21 आसने
1. प्रार्थना
ऊं संगच्छध्वं संवदर्ध्य
सं वो मनासि जानताम
गेवा भागां यथा पूर्वे
सञजानना उपासते

2. रिलॅक्सेशन (शिथिलीकरण अभ्यास)
रिलॅक्स होण्यासाठी उभं राहून किंवा बसून काही व्यायाम केले जातात.
- ग्रीव्हा (कमरेखालील भाग)चे व्यायाम
- कटि (कंबर)चे व्यायाम
- गुडघ्याचे व्यायाम
3. योगासाने
उभे राहून केली जाणारी आसने...
- ताडासन
- वृक्षासन
- पाद-हस्तासन
- अर्धच्रकासन

बसून केली जाणारी आसने
- भद्रासन
- अर्धउष्ट्रासन
- शशांकासन
- वक्रासन

पोटावर झोपून केली जाणारी आसने...
- भुजंगासन
- सलभासन
- मकरासन

पाठीवर झोपून केली जाणारी आसने
- सेतुबंधासन
- पवनमुक्तासन
- शवासान

4. कपालभाती
ध्यानाची आसने सुखासन/ पद्मासन/ वज्रासन यात बसून करावे.
5. प्राणायाम
- नाडी शोधन (अनुलोम विलोम) प्राणायाम
- भ्रामरी प्राणायाम

6. ध्यान

7. संकल्प

8. शांती पाठ
ऊं सर्वे भवन्तु सुखिन, सर्वे सन्तु निरमय
सर्वे भ्रद्राणि फश्यन्तु, मा कश्चिद्द:खभाग्भवेत
ऊं शांती: शांती: शांती:
पुढील स्लाइड्सवर पाहा राजपथासह देशभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या योग सोहळ्याचे इतर PHOTO आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO