आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग करताना श्लोकांऐवजी अल्लाहचे नाव घ्या, मंत्री नाईकांचा मुस्लिमांना सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त केंद्र सहमती बनवण्याची तयारी करत आहे. सरकारने सूर्यनमस्कारानंतर योगासने करताना श्लोकांचे उच्चारण सक्तीचे नसल्याचे म्हटले आहे. काही मुस्लिम संघटनांनी गुरुवारी आयुषमंत्री श्रीपद नाईक यांची भेट घेतली. नाईक म्हणाले, मुस्लिमांना श्लोकांचे उच्चारण करायचे नसेल तर ते त्याच्याऐवजी अल्लाहचे नाव घेऊ शकतात. दारुल उलूमनेही योगाला पाठिंबा दिला आहे. दारुलच्या प्रवक्त्याने म्हटले की, योग हा एक व्यायाम अाहे. त्याला धर्म वा जातीशी जोडून पाहू नये. इस्लाममध्ये फक्त अल्लाहची करुणा भाकली जाते. यामुळे सूर्यनमस्काराचे समर्थन केले जाऊ शकत नाही. मात्र, योगाबाबत आमची काहीच अडचण नाही.