आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

76 वर्षांपासून प्रॅक्टिस करतोय, एखाद्यास आदर्श मानण्याचे होते, कोणी भेटलेच नाही: जेठमलानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी वकिलीतून निवृत्ती घेत आहेत. शनिवारी वकील मंडळाच्या कार्यक्रमात त्यांनी १४ सप्टेंबरला वयाच्या ९५ व्या वर्षी निवृत्तीची इच्छा व्यक्त केली. जेठमलानींच्या नावावर देशातील सर्वात कमी व सर्वात जास्त वयाचे वकील हा विक्रम आहे. ते १९ व्या वर्षी वकिली सुरू करून ७६ वर्षापासून या व्यवसायात आहेत. निवृत्तीच्या घोषणेनंतर जेठमलानींची कोणत्याही माध्यमातील ही पहिली मुलाखत...
 
जेठमलानी यांच्यासाठी न्यायाधीशांनाही तयारी करून यावी लागत हेाती, असे म्हटले जाते. तुमच्यासाठी सर्वात कठीण काय?
>एखाद्यासमोर निराश झालो असे न्यायाधीश मिळाले नाहीत. मी प्रत्येक खटल्यात जीव तोडून कष्ट घेतले. बऱ्याचदा माझ्या तर्कामुळे जज मात्र निराश झाले. मात्र तेही आदर करतात.

तुम्ही आसाराम, अफजल गुरू, इंदिरा गांधी व राजीव गांधींच्या मारेकऱ्यांचा युक्तिवाद का केला?
>खटला लढवणे वकिलाचे काम आहे. चांगले- वाईटाच्या अाधारावर खटल्याची निवड करणे वकिलीच्या तत्वांविरूद्ध आहे. खटला स्वीकारताना माझ्याकडे येणाऱ्या अशिलाविरुद्ध किती बनावट साक्षीदार तयार केले आहेत हे मी पाहतो. प्रतिमेला महत्त्व नसते.
 
खेळाडू निवृत्त हाेतात. एखाद्या वकिलाची अशी कदाचित पहिली निवृत्ती असेल. हे प्रसिद्धीसाठी का?
>मी ज्या शिखरावर आहे, आणखी कोणती प्रसिद्धी हवी? आठवडाभरापूर्वी न्या. कुरियन जोसेफ यांना म्हटले होते हा माझा शेवटचा खटला आहे. 

राम जेठमलानींना कोणासारखे व्हावे वाटत होते?
>७६ वर्षांत खूप चांगले व आदर करण्यायोग्य 
लोक भेटले. मात्र, ज्याला मी आदर्श मानू असा एकही मिळाला नाही.

कोणता खटला तुमच्यासाठी खूप कठिण होता?
>पहिला खटला आपल्या हक्कांसाठी लढला होता. मी पाकिस्तानातून आल्याने निर्वासित होतो. तेव्हा महाराष्ट्रात मोरारजीभाई देसाईंच्या सरकारने बॉम्बे रिफ्यूजी अॅक्ट पारीत केला होता. त्यावेळी निर्वासितांना गुन्हेगारांसारखे वागवण्यास सांगितले होते. यामुळे निर्वासितांना एका वसाहतीतून हलवून दुसऱ्या वसाहतीत स्थलांतरीत केले जाऊ लागले. याला मी आव्हान दिले आणि यश मिळाले. मुंबई उच्च न्यायालयाने तो कायदा रद्द केला.

तुमचा हा कायदेशीर पहिला लढा होता? 
>नाही. स्वातंत्र्या आधी मी १७ व्या वर्षी कायद्याची पदवी प्राप्त केली होती. मात्र, बार काउंसिलकडून २१ व्या वयाआधी वकिलीची सनद मिळत नव्हती. मी कराचीच्या मुख्य न्यायमूर्तींना भेटलो. १७ व्या वर्षी विधी पदवी मिळाली तेव्हा हा नियम नव्हता त्यामुळे माझ्याबाबत तो लागू होत नसल्याचे त्यांना सांगितले. न्यायमूर्तींनी ते मान्य केले. बार काउंसिलला परवाना देण्यास सांगितले. मला १८ व्या वर्षीच व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळाली. 

तुम्ही आतापर्यंत किती खटले लढलात? तुम्ही गेले नाहीत असे एखादे कोर्ट? 
>लाखो खटले लढले. विक्रमासाठी कधी मोजमाप केली नाही. सुरुवातीस खटल्याची माहिती ठेवत होतो. नंतर सोडून दिले. देशातील हायकोर्टात गेलो नाही असे कदाचित एकही हायकोर्ट नसेल. 

व्यवसायातील एखादी निराश करणारी बाब? 
>हो. अनेकदा तयारी करूनही अशिलासाठी कोर्टात हजर झाल्यावर तो कानात येऊन म्हणायचा वकील साहेब युक्तिवाद करू नका आमच्यात तडजोड झाली आहे. अशा लोकांची चीड येते. तडजोड करायची होती तर वकील कशाला लावतात. 

राजकारणात तुम्ही तुमच्याच पक्षाचे विरोधी पक्ष झालात. नेता होऊ शकला नाहीत. 
>राजकारणात धूर्त लोक जास्त आहेत. ते काँग्रेस भाजपमध्येही आहेत. त्यामुळे बऱ्याचदा संघर्ष हाेत असतो. राजकारणातून भ्रष्टाचार नष्ट करणे हा माझा हेतू आहे. 

तुम्ही अनेकदा नेत्यांच्या धोक्याबद्दल बोलता, एखादे उदाहरण? 
>मी लालकृष्ण अडवाणी यांचा एक खटला लढला होता. त्या खटल्यात पहिल्यांदा सत्र न्यायालयात अरुण जेटली अडवाणींचे वकील होते. कोर्टात अडवाणींविरुद्ध आरोप निश्चित झाले होते. तुम्हाला माझा खटला लढावा लागेल यासाठी अडवाणी यांनी घराबाहेर धरणे दिले. मी हायकोर्टातून त्यांना दिलासा दिला. त्याची परतफेड अशी मिळाली की त्याच अडवाणी यांनी भाजपतून माझ्या निलंबनाच्या पत्रावर स्वाक्षरी केली. 

मोदीतुमचे चांगले मित्र राहिलेले आहेत. त्यांच्याबद्दल काय सांगाल? 
>नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र राहिलेले आहेत. ते पंतप्रधान झाले तेव्हा मी संडे गार्डियनमध्ये एक लेख लिहिला होता. त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या यशात छोटे योगदान माझेही आहे. या लेखामुळेच भाजपमध्ये माझे खूप शत्रू झाले. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आभार व्यक्त करायचे लांब, माझ्याशी बोललेही नाहीत. त्यांनी माझ्याविषयी एक शब्दही काढला नाही. 

बहुतांश लोकांना माहीत नसलेला तुमचा एखादा पैलू सांगा? 
>मी कोणतेही काम लपून करत नाही. माझे जीवन खुले पुस्तक आहे. त्यामुळे लोकांना माहीत नाही, असा पैलू नाही. 

निवृत्तीनंतर काय करणार? पूर्ण करावी अशी वाटणारी एखादी इच्छा? 
>मी वकिली व्यवसायातून निवृत्ती घेतली आहे राजकारणातून नव्हे. आता माझा लढा राजकारणातील वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध असेल. 
बातम्या आणखी आहेत...